इंग्रजी शाळांना आठ वर्षाची व चालू सत्रातील आरटीई प्रतिपूर्ती द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2022 20:18 IST2022-12-23T20:17:35+5:302022-12-23T20:18:03+5:30
Nagpur News महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या वतीने विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला.

इंग्रजी शाळांना आठ वर्षाची व चालू सत्रातील आरटीई प्रतिपूर्ती द्यावी
नागपूर : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांना मागील आठ वर्षांची उर्वरीत व या सत्रातील पूर्ण आरटीई प्रतिपूर्ती शुल्काची रक्कम त्वरीत त्यांच्या खात्यात वळती करावी यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनच्या वतीने विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात सहभागी इंग्रजी शाळांच्या संचालकांनी आपल्या मागण्यांसाठी नारेबाजी करून शासनाचे लक्ष वेधले.
नेतृत्व : डॉ. संजय तायडे पाटील, नामदेव दळवी, प्रा. विजय पवार, डॉ. विनोद कुळकर्णी, अनिल आसलकर, मनीष हांडे, सोमनाथ वाघमारे, डॉ. मोहन राईकवार
मागण्या :
-शाळांना मागील आठ वर्षांची आरटीईची प्रतिपूर्ती द्यावी
-शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला व दुसऱ्या शाळेची फी भरल्याचे ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे करावे
-इंग्रजी शाळांना व्यावसायिक दराने वीज बिल, पाणी कर व मालमत्ता कर लावू नये
-इंग्रजी शाळांसाठी खासदार व आमदार निधी वापरण्याची तरतूद करावी
-अनावश्यक ऑनलाईन कामातून इंग्रजी शाळांना सूट द्यावी
-इंग्रजी शाळांसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा लागू करावा
......................