शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अभियांत्रिकीची ‘क्रेझ’ घसरतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:38 IST

एक काळ होता जेव्हा अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडायच्या. मात्र काळाच्या ओघात शिक्षण प्रणालीमध्ये अनेक बदल होत असून,

ठळक मुद्देकसे मिळणार दर्जेदार अभियंतोरिक्त जागांचे प्रमाण चिंताजनकेमहाविद्यालयांनी चिंतन करण्याची वेळेरोजगारावर परिणामआज अभियंता दिन

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक काळ होता जेव्हा अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडायच्या. मात्र काळाच्या ओघात शिक्षण प्रणालीमध्ये अनेक बदल होत असून, अभियांत्रिकीकडे असलेला विद्यार्थ्यांचा कल घसरणीला लागला आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने महाविद्यालयांना रिक्त जागांच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. नागपूर विभागात ५६ अभियांत्रिकी महाविद्यालये असली तरी यातील काही महाविद्यालये सोडली तर बहुतांश ठिकाणी ही समस्या आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संख्या वाढली असली तरी विभागातील तीन महाविद्यालयांनाच ‘एनआरएफ’(नॅशनल रँकिंग फ्रेमवर्क)मध्ये पहिल्या १०० मध्ये स्थान प्राप्त करता आले आहे. राष्ट्रीय अभियंता दिवसाच्या निमित्ताने देशाला अभियंते देणाºया महाविद्यालयांनी रिक्त जागा आणि ढासळणारा दर्जा यांच्यावर मंथन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.अभियांत्रिकीमध्ये ‘बूम’ असताना राज्यभरात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पीक आले. मात्र मागील पाच वर्षांपासून अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून मोठ्या प्रमाणावर तुकड्या कमी करण्यात येत आहेत. कमी प्रवेशसंख्या असल्यामुळे मोठा डोलारा सांभाळणे महाविद्यालयांना कठीण झाले आहे. अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी उपलब्ध जागा या प्रवेशोच्छुक उमेदवारांपेक्षा जास्त असल्याचे राज्य शासनाने कबूल केले होते. २०१०-११ पासून रिक्त जागांच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे व हीच बाब मोठ्या प्रमाणात उघडलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. महाविद्यालयांत प्रवेशच नसल्यामुळे अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थिती अडचणीची झाली आहे.याचा फटका तेथील प्राध्यापकांना बसत असून, अनेक ठिकाणी तर सहा-सहा महिने वेतन मिळालेले नाही. ही स्थिती पाहता महाविद्यालय प्रशासनाच्या चिंतेत निश्चितच आणखी भर पडली आहे. ‘कॅप’च्या अंतर्गत विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांनाच जास्त प्राधान्य देतात. हीच बाब लक्षात घेता, व्यवस्थापन ‘कोटा’मधून मिळतील तितके प्रवेश करण्याचा महाविद्यालयांचा प्रयत्न असतो.राज्यातील ३६० अभियांत्रिकी महाविद्यालयांत १ लाख ३८ हजार २२६ जागा आहेत.‘कॅप’च्या माध्यमातून यापैकी केवळ ८१ हजार ७७४ जागांवरच प्रवेश झाले. राज्यभरात ५६ हजार ४५२ म्हणजेच म्हणजेच सुमारे ४० टक्के जागा रिक्त राहिल्या.नागपूर विभागात तर रिक्त जागांचे प्रमाण आणखी जास्त आहे. यंदा विभागात ‘कॅप’अंतर्गत ५६ महाविद्यालयांतील २२ हजार २६६ जागांपैकी केवळ १२ हजार २२४ जागांवर प्रवेश झाले. ४४.९९ टक्के जागा रिक्त राहिल्या.दर्जेदार अभियंत्यांची कमतरतारिक्त जागा जास्त असल्याने महाविद्यालयांवर आर्थिक ताण येतो. महाविद्यालयांचा पसारा मोठा असल्याने, मग काही गोष्टींवर कात्री चालविण्यात येते. प्राध्यापकांना कमी करण्यात येते, तांत्रिक सुविधा हव्या तशा पुरविण्यात येत नाहीत. याचा परिणाम शिक्षणाच्या दर्जावर होतो. त्यामुळे महाविद्यालयांतून केवळ पुस्तकी ज्ञान असलेले अभियंता बाहेर पडतात. उद्योगक्षेत्रातील नामवंतांनी ही बाब वारंवार अधोरेखित केलेली आहे. अगदी ‘इन्फोसिस’चे माजी संचालक नारायण मूर्ती यांनी तर महाविद्यालयांतील ७५ टक्के अभियंता हे काहीच कामाचे नसतात, असे विधान नागपुरातच केले होते. महाविद्यालयांचा घसरता दर्जा, रोजगाराचे कमी प्रमाण आणि वाढलेले शुल्क यामुळे अभियांत्रिकीकडे येण्याचा विद्यार्थ्यांचा कल कमी होत असल्याचे चित्र आहे.रोजगार, निकाल, दर्जा यांचा विचार व्हावाअभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर निघणाºया विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप आहे. मात्र त्यातुलनेत रोजगाराचे प्रमाण कमी आहे. गेल्या काही वर्षांत ‘बेसिक सायन्स’कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. शिवाय महाविद्यालयांचे निकाल, त्यांचा दर्जा याचा अभ्यास विद्यार्थी अगोदरच करतात. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभियांत्रिकी क्षेत्राला फटका बसतो आहे. या विविध कारणांमुळे रिक्त जागांचे प्रमाण वाढीस लागले आहे. महाविद्यालयांनी दर्जेदार अभियंते निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. केवळ ‘पॅकेज’साठी नव्हे तर स्वत:ला सिद्ध करून काही तरी नवीन करून दाखविणारे अभियंते घडविले पाहिजे, असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी व्यक्त केले.‘रँकिंग’मध्ये महाविद्यालये माघारलेलीचकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क’अंतर्गत देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ जाहीर करण्यात येते. यात यंदा नागपुरातील शैक्षणिक संस्था माघारल्याचे दिसून आले. ‘व्हीएनआयटी’(विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) सोडले तर नागपुरातील एकाही संस्थेला पहिल्या ५० मध्ये ‘रँकिंग’ मिळालेले नाही. ‘व्हीएनआयटी’चा देशात ४२ वा क्रमांक आहे. मागील वर्षी ‘व्हीएनआयटी’ १९ व्या स्थानावर होते. अभियांत्रिकी संस्थांच्याच यादीमध्ये ‘आरकेएनईसी’ (रामदेव बाबा कमला नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज) व जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय यांचा क्रमांक अनुक्रमे ६४ व ६७ वा आहे. विभागात ५६ महाविद्यालये असताना, त्यातील केवळ दोघांना पहिल्या शंभरात मिळालेले स्थान दर्जाबद्दल बरेच काही सांगून जाते.रोजगाराच्या संधीच नसल्याने निरुत्साहमहाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना निरनिराळ्या आॅफर देण्यात येतात. मात्र भरमसाट शुल्क भरूनदेखील विद्यार्थ्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही. अनेकांना तर कॅम्पस मुलाखतींदरम्यान १५ हजारांच्या आतीलच नोकरी देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा निरुत्साह आहे.