अभियांत्रिकीचे प्रवेश चुकीच्या पद्धतीने
By Admin | Updated: August 25, 2016 02:13 IST2016-08-25T02:13:24+5:302016-08-25T02:13:24+5:30
राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमधील

अभियांत्रिकीचे प्रवेश चुकीच्या पद्धतीने
अखिल भारतीय कोटा :
राज्य शासनाची हायकोर्टात कबुली
नागपूर : राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून यावर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमधील अखिल भारतीय कोट्यातील जागांवर चुकीच्या पद्धतीने प्रवेश देण्यात आल्याची कबुली दिली आहे. तसेच, पुढील शैक्षणिक सत्रापासून या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, अशी ग्वाहीदेखील दिली आहे.अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण जागांमध्ये १५ टक्के अखिल भारतीय कोटा असतो. त्यासाठी केंद्र शासनातर्फे जेईई परीक्षा घेतली जाते. तसेच, राज्यस्तरीय जागांसाठी राज्य शासनातर्फे एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. अखिल भारतीय कोट्यातील जागा सर्वप्रथम जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून भरल्या जाणे अपेक्षित आहे. त्यानंतर उरलेल्या जागांवर एमएचटी-सीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देता येतो. यावर्षीच्या प्रवेश नियमामध्ये अखिल भारतीय कोट्यासाठी जेईई किंवा एमएचटी-सीईटी परीक्षा देणे आवश्यक असल्याची तरतूद करण्यात आली होती.