कार दुभाजकावर धडकून अभियंत्याचा मृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:07 IST2021-06-21T04:07:38+5:302021-06-21T04:07:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पुण्यावरून एव्हिएशनचा कोर्स पूर्ण करून आल्याच्या आनंदात मित्रांसोबत पार्टीला निघालेल्या तरुणाची भरधाव कार दुभाजकावर ...

कार दुभाजकावर धडकून अभियंत्याचा मृत्य
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पुण्यावरून एव्हिएशनचा कोर्स पूर्ण करून आल्याच्या आनंदात मित्रांसोबत पार्टीला निघालेल्या तरुणाची भरधाव कार दुभाजकावर धडकली. त्यामुळे एका अभियंत्याचा मृत्यू झाला तर दोघे जबर जखमी झाले. शनिवारी मध्यरात्री हा अपघात सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.
मनीष राजेंद्र पिल्लेवार (वय २७, रा. अजनी चाैक) असे मृताचे नाव आहे.
मनीष नुकताच पुण्याहून एव्हिएशनचा कोर्स करून नागपुरात आला. त्या आनंदात पार्टी करण्यासाठी तो आणि त्याचा मित्र प्रवीण किरण मैत्रेकर (वय ३२, रा. अजनी चाैक) हे दोघे वेदप्रकाश गरुडशंकर मिश्रा (वय ३३, रा.मानकापूर) याच्या कारमध्ये बसून शनिवारी मध्यरात्री जात होते. आरोपी मिश्राने वेगात कार चालवून मनीषनगर ओव्हरब्रीजच्या दुभाजकावर धडक दिली. त्यामुळे तिघेही गंभीर जखमी झाले. डॉक्टरकडे नेले असता त्यांनी मनीषला मृत घोषित केले. प्रवीण आणि मिश्रा जखमी आहेत. प्रवीणच्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी आरोपी मिश्राविरुद्ध् गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---