उपचाराअभावी अभियंत्याचा मृत्यू
By Admin | Updated: January 28, 2016 03:05 IST2016-01-28T03:05:07+5:302016-01-28T03:05:07+5:30
रेल्वेस्थानकावर खासगी कंपनीत कार्यरत अभियंत्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली.

उपचाराअभावी अभियंत्याचा मृत्यू
रेल्वेस्थानकावरील घटना : मुलगा सोडून गेल्यानंतर घडली घटना
नागपूर : रेल्वेस्थानकावर खासगी कंपनीत कार्यरत अभियंत्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना घडली. कंपनीने वेळेवर उपचार न केल्यामुळे अभियंत्याचा मृत्यू झाल्याची तक्रार विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडे केली आहे.
कॉसमॉस टाऊन जयताळा रोड येथील रहिवासी संपतराज कोटेचा (४५) हे स्टार सकर््िलप्स अँड इंजिनिअरिंग लिमिटेड, हिंगणामध्ये महाव्यवस्थापक होते. १९ जानेवारीला बुटीबोरी येथील कंपनीच्या एका समारंभात ते सहभागी झाल्यानंतर जयपूरला जाण्यासाठी १९ जानेवारीला रात्री रेल्वेस्थानकावर पोहोचले. बिलासपूर-भगत की कोठी एक्स्प्रेस ने सोडण्यासाठी त्यांचा मुलगा रेल्वेस्थानकावर आला. गाडीला वेळ असल्यामुळे त्यांनी मुलाला परत पाठविले. त्यानंतर भोवळ येऊन ते प्लॅटफार्मवर पडले. लोहमार्ग पोलिसांनी त्वरित कोटेचा यांच्याकडून नंबर घेऊन त्यांच्या मुलाला माहिती दिली. मुलगा अनिश रात्री १.०५ वाजता आई सवितासोबत रेल्वेस्थानकावर पोहोचला. (प्रतिनिधी)