शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

पाच वर्षात विदर्भातील १.८४ लाख कृषीपंपांचे ऊर्जीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:17 PM

महावितरणने मागील पाच वर्षात विदर्भातील १ लाख ८४ हजार २१७ कृषीपंपांचे परंपरागत पद्धतीने ऊर्जीकरण केले आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर करण्यात आलेल्या एकूण कृषीपंपांच्या ऊर्जीकरणाच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे २८ टक्के आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणने मागील पाच वर्षात विदर्भातील १ लाख ८४ हजार २१७ कृषीपंपांचे परंपरागत पद्धतीने ऊर्जीकरण केले आहे, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर करण्यात आलेल्या एकूण कृषीपंपांच्या ऊर्जीकरणाच्या प्रमाणात हे प्रमाण सुमारे २८ टक्के आहे. सोबतच पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषीपंपाचे ऊर्जीकरण करण्याचे कामही सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे.३१ मार्च २०१४ रोजी विदर्भातील अकराही जिल्ह्यात ऊर्जीकरण झालेल्या कृषीपंपांची एकूण संख्या ही ६ लाख ५५ हजार ९४ एवढी होती. यात मागील पाच वर्षात तब्बल १ लाख ८४ हजार २१७ ने वाढ होऊन ३१ मार्च २०१९ रोजी विदर्भातील ऊर्जीकरण झालेल्या कृषीपंपांची एकूण संख्या ८ लाख ३९ हजार ३११ म्हणजेच सुमारे २८ टक्क्यांनी वाढली आहे. याशिवाय चालू आर्थिक वर्षात ३० जून २०१९ पर्यंत ५ हजार १८८ कृषीपंपांचे ऊर्जीकरण करण्यात आले असून पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या कृषीपंपांना वीज जोडणी देण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले आहे.३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या सर्व कृषीपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून ३१ मार्च २०२० पर्यंत वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणतर्फे मोठ्या प्रमाणात कामे हाती घेण्यात आली असून निर्धारित वेळेत या सर्व वीजजोडण्या केल्या जातील असा विश्वास महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी व्यक्त केला आहे.पाच वर्षात जिल्हानिहाय कृषीपंपाचे झालेले ऊर्जीकरणजिल्हा      कृषीपंपाची संख्या      चालू आर्थिक वर्षात------------------------------------अकोला   १४ हजार ७५६             ३७५बुलडाणा  २५ हजार ५०३         १,३६८वाशिम     १२ हजार ५७२            ३४२अमरावती २५ हजार ८३३        ४८०यवतमाळ २१ हजार २२८       ६६२चंद्रपूर      १४ हजार ४३          २११गडचिरोली १३ हजार ९२३    २०३भंडारा     ११ हजार ४६५         ३८२गोंदिया   १३ हजार ५७३        ४२३नागपूर   १४ हजार ८९६        ५१९वर्धा    १६ हजार ४२५             २२३

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज