शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

नागपुरात सिलिंग फॅन पडून दोन महिन्यांच्या बालिकेचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 13:52 IST

नेत्राला जन्म घेऊन अवघे दोनच महिने झाले होते. सोमवारी सायंकाळी ती तिच्या घरातील बेडवर निद्रीस्त होती. अचानक सिलींग फॅन तिच्या अंगावर पडला अन् गंभीर जखमी झालेली नेत्रा नंतर कायमचीच निद्रीस्त झाली.

ठळक मुद्देआई दैनंदिन कामात व्यस्त असताना घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नेत्राला जन्म घेऊन अवघे दोनच महिने झाले होते. काय आहे, काय नाही हे बघण्याची, समजण्याची तिला नीट दृष्टीही आली नव्हती. जन्मदात्रीच्या कुशीतच तिचे विश्व होते. दिवसातील बराचसा वेळ नेत्रा निद्रिस्तच राहायची. सोमवारी सायंकाळी ती तिच्या घरातील बेडवर निद्रीस्त होती. अचानक सिलींग फॅन तिच्या अंगावर पडला अन् गंभीर जखमी झालेली नेत्रा नंतर कायमचीच निद्रीस्त झाली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही करुणाजनक घटना घडली.गणेश वाडेकर हे खरबीतील डायमंडनगरात राहतात. ते एका ट्रान्सपोर्ट कार्यालयात काम करतात. दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या पत्नीने एका गोंडस कन्येला जन्म दिला. वाडेकर कुटुंबीयांनी तिचे नाव नेत्रा ठेवले. आजुबाजूला काय आहे, कोण आहेत, याची अद्याप नेत्राला जाणीवच नव्हती. आईच्या कुशीतच तिचे जग. नेत्राची आईदेखील तिला जिवापाड जपायचा प्रयत्न करायची. घरातील आवश्यक कामे करून ती नेत्राला सारखी कुशीतच घेऊन राहायची. सोमवारी असेच झाले. सायंकाळी ५.१५ च्या सुमारास नेत्रा निद्रीस्त असल्याने तिला बिछान्यावर ठेवून तिची आई दैनंदिन कामात व्यस्त झाली. अचानक काही तरी पडल्याचा आणि त्याबरोबरच चिमुकल्या नेत्राच्या रडण्याचा आईला आवाज आला. ती धावतच घरात आली. नेत्राच्या अंगावर सिलींग फॅन पडला होता. आईने कसा बसा तो बाजूला फेकून नेत्राला छातीशी कवटाळले. ती निपचित झाली होती. धावपळ सुरू झाली. गणेश वाडेकर आले. त्यांनी नेत्राला प्रारंभी बाजूच्या डॉक्टरकडे नेले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी नेत्राला बालकांच्या इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, वाडेकर दाम्पत्य आणि त्यांच्या स्वकियांनी नेत्राला चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये नेले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. चिमुकलीचा असा आकस्मिक मृत्यू झाल्याने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू