भय संपता संपेना, २४ तासांत ७९ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:07 IST2021-04-18T04:07:17+5:302021-04-18T04:07:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना जीवावर उठलाय. भय संपता संपेना, अशीच स्थिती सध्याची आहे. मृत्यू आणि रुग्णसंख्येचा ग्राफ ...

भय संपता संपेना, २४ तासांत ७९ मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना जीवावर उठलाय. भय संपता संपेना, अशीच स्थिती सध्याची आहे. मृत्यू आणि रुग्णसंख्येचा ग्राफ वाढतच चालला आहे. शनिवारी ६,९५६ पॉझिटिव्ह आढळून आले तर २४ तासात सर्वाधिक ७९ लोकांचे कोरोनाने जीव घेतले. यात शहरातील ४०, ग्रामीणमधील ३३ तर जिल्ह्याबाहेरील ६ जणांचा समावेश आहे. मागील १३ महिन्यांचा विचार करता सप्टेंबरनंतर एप्रिल महिन्यात मृत्यूने हा उच्चांकच गाठला आहे. १ ते १७ एप्रिल या कालावधीत तब्बल १,०८९ लोकांचा मृत्यू झाला. १ एप्रिलपासून दररोज ६० हून अधिक जीव जात आहेत.
फेब्रुवारी महिन्यात नागपूर जिल्ह्यात १७७ मृत्यू झाले. तर मार्च महिन्यात मृतांची संख्या ७६३ झाली. एप्रिल महिन्यात १७ दिवसांत १,०८९ जणांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात २४,१६३ पॉझिटिव्ह आढळून आले होते. तर ९१९ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १,४६५ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता एप्रिल महिन्यात मृत्यूने उच्चांक गाठला आहे. एप्रिल महिन्यात १७ दिवसांत ८६,५०३ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ६,१८८ मृत्यू झाले. यात शहरातील ३,८२८ तर ग्रामीणमधील १,४१२ जणांचा समावेश आहे. तर ९४८ जिल्ह्याबाहेरील आहेत. सध्या ६६,२०८ हून अधिक ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मागील १० दिवसांतील पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू
७ एप्रिल ५,३३८ ६६
८ एप्रिल ५,५१४ ७३
९ एप्रिल ६,४८९ ६४
१० एप्रिल ५,१३१ ६५
११ एप्रिल ७,२०१ ६३
१२ एप्रिल ५,६६१ ६९
१३ एप्रिल ६,८२६ ६५
१४ एप्रिल ५,९९३ ५७
१५ एप्रिल ५,८१३ ७४
१६ एप्रिल ६,१९४ ७५
१७ एप्रिल ६,९५६ ७९