शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याने चिमुकल्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:51 IST

शौचालयाच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या सेफ्टी टँकमध्ये पडल्याने पाच वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आर्यन नवदीप राऊत असे या मृत बालकाचे नाव आहे. दवलामेटी ग्रामपंचायततर्फे स्थानिक समाजभवनाजवळ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. सेफ्टी टॅन्ककरिता खोदलेल्या खड्ड्यात आर्यनचा मृतदेह पाण्यात तरंगत आढळल्याने मंगळवारी सकाळी या परिसरात खळबळ उडाली.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या दवलामेटीतील घटना: ग्रामपंचायत प्रशासनाचा निष्काळजीपणा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (वाडी) : शौचालयाच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या सेफ्टी टँकमध्ये पडल्याने पाच वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आर्यन नवदीप राऊत असे या मृत बालकाचे नाव आहे. दवलामेटी ग्रामपंचायततर्फे स्थानिक समाजभवनाजवळ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. सेफ्टी टॅन्ककरिता खोदलेल्या खड्ड्यात आर्यनचा मृतदेह पाण्यात तरंगत आढळल्याने मंगळवारी सकाळी या परिसरात खळबळ उडाली.पोलीस सूत्राच्या माहितीनुसार समाजभवनाच्या काही अंतरावरच नवदीप राऊत यांचे घर आहे. नवदीप राऊत ऑटो चालक आहेत. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आर्यन या परिसरात खेळत होता. आई सारिका घरच्या दैनंदिन कामात व्यस्त होती. घरी आजी-आजोबा आराम करीत होते. आर्यन घरासमोरील पटांगणात खेळत होता, म्हणून घरची मंडळी निश्चिंत होती. भरपूर वेळ होऊन अंधार पडला असतानाही आर्यन घरी न आल्याने राऊत कुटुंबीयांची तारांबळ उडाली. परिवाराने दोन तास इतरत्र शोध घेतला. परंतू आर्यन न मिळाल्याने वडिलांनी वाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनीदेखील आर्यनचा मध्यरात्रीपर्यंत शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. मंगळवारी पहाटे ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी असलेल्या समाजभवनाच्या नजीक बांधण्यात येत असलेल्या शौचालयाच्या सेफ्टी टँकच्या खड्ड्यात एका मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. मृतदेह बाहेर काढला असता तो आर्यनचाच होता. समाजभवन परिसरात ताराची जाळी लावली असली तरी मुले नेहमी जाळी ओलांडून खेळण्याकरिता जात असतात. हे माहीत असताना खबरदारीची कोणतीही उपाययोजना न केल्याने आणि ऐन पावसाळ्यात शौचालयाचे बांधकाम का सुरू केले, असे प्रश्न निर्माण होत आहेत. स्थानिक प्रशासनाला कंत्राटदाराचे नाव विचारले असता ग्रामपंचायतच हे काम करीत असल्याची माहिती देण्यात आली. परंतु खेमका नावाचा कंत्राटदार हे काम करीत असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र ग्रा.पं. प्रशासन कंत्राटदाराचे नाव लपवीत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. तसेच स्थानिक नेते हे प्रकरण दाबत असल्याचीही चर्चा सर्वत्र आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणाने चिमुकल्याचा जीव गेला. आर्यनला नऊ वर्षाचा मोठा भाऊ व दोन वर्षाची लहान बहीण आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर