शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

साई मंदिरातील अतिक्रमण दहा दिवसात हटविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 19:36 IST

वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण येत्या दहा दिवसामध्ये हटविण्यात येणार आहे. महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही ग्वाही दिली. तसेच, या कारवाईकरिता पोलीस संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केल्याचे सांगितले.

ठळक मुद्देमनपाची हायकोर्टात ग्वाही : पोलीस संरक्षणाकरिता अर्ज केला

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण येत्या दहा दिवसामध्ये हटविण्यात येणार आहे. महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाला ही ग्वाही दिली. तसेच, या कारवाईकरिता पोलीस संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केल्याचे सांगितले.यासंदर्भात श्री साईबाबा सेवा मंडळाने याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. श्री साईबाबा सेवा मंडळाने ३१ डिसेंबर १९७४ रोजी पी. के. बॅनर्जी व शिबाणी बॅनर्जी यांची १० हजार ८९४ चौरस फुटाची जमीन (ख. क्र. ४३/४) ३५ हजार रुपयांमध्ये तर, लक्ष्मण भोयर व इतरांची ४५०० चौरस फूट जमीन (ख. क्र. ४३/६) ९३ हजार ५०० रुपयांमध्ये खरेदी केली. दोन्ही जमिनी विवेकानंदनगर येथे आहेत. या जमिनीच्या काही भागावर ९ व्यक्तींनी अतिक्रमण करून दुकाने बांधली आहेत. १९ मार्च १९९९ रोजी अवैध बांधकाम पाडण्याची नोटीस बजावल्यानंतर या व्यक्तींनी दिवाणी न्यायालयात दावे दाखल केले होते. परंतु, त्यांना संबंधित जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करता आला नाही. दरम्यान, १ जानेवारी २०२० रोजी महानगरपालिकेने सर्वांना नोटीस बजावून जमीन रिकामी करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे अतिक्रमण कायम आहे. दर गुरुवारी ५० हजारावर भाविक साईबाबांच्या दर्शनाकरिता मंदिरात येतात. त्यांना पार्किंगकरिता त्रास सहन करावा लागतो. मंदिर परिसरातील अतिक्रमणामुळे वाहने पार्किंगची व्यवस्था करता येत नाही असे मंडळाचे म्हणणे आहे. मंडळातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :saibabaसाईबाबाnagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय