चार अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:33 IST2018-11-13T00:32:31+5:302018-11-13T00:33:33+5:30
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नासुप्रने मागील काही महिन्यांपासून नागपूर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी पूर्व नागपुरातील चार धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले.

चार अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नासुप्रने मागील काही महिन्यांपासून नागपूर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी पूर्व नागपुरातील चार धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले.
नासुप्रच्या क्षतिपथकाने पूर्व नागपुरातील पॉप्युलर को-आॅप. हा. सोसायटी (हनुमाननगर), अमर संजय को-आॅप. हा. सोसायटी (न्यायमंदिर), पंचदीप को-आॅप. हा. सोसायटी व बोरकुटे लेआऊट (जय अंबे मंदिर) या ठिकाणच्या धार्मिक स्थळांचा यात समावेश होता. तत्पूर्वी नासुप्रच्या क्षतिपथकांना नागरिकांनी मदत केली. त्यांनी समंजसपणा दाखवीत मंदिरामधील मूर्ती स्वत: काढून घेतल्या व मंदिर रिकामे करून दिले.
अतिक्रमण काढण्याची कार्यवाही दोन टिप्पर आणि दोन जेसीबीची मदत घेण्यात आली. सकाळी ११ ते सायकांळी ५ दरम्यान ही कारवाई करण्यात आली. नासुप्रचे सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशाप्रमाणे व अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता(पश्चिम) प्रमोद धनकर, विभागीय अधिकारी (पश्चिम) पंकज आंभोरकर, क्षतिपथकाचे मनोहर पाटील तसेच बेलतरोडी आणि सोनेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडली.