कस्तूरचंद पार्कला अतिक्रमणाचा विळखा
By Admin | Updated: October 30, 2016 02:38 IST2016-10-30T02:38:52+5:302016-10-30T02:38:52+5:30
नागपूरची ओळख असलेले ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क सध्या अतिक्रमणाने वेढले आहे.

कस्तूरचंद पार्कला अतिक्रमणाचा विळखा
नागपूरची ओळख असलेले ऐतिहासिक कस्तूरचंद पार्क सध्या अतिक्रमणाने वेढले आहे. उठसूठ कुणीही येतो आणि या परिसरात व्यवसाय थाटतो. भजे, पोहे, भेळ, पाणीपुरी, नारळ विक्रेत्यांची ही हक्काचीच जागा झाली आहे. त्यांच्यावर कुणी कारवाईच करीत नाही म्हणून त्यांचे फावते. या वाढत्या व्यवसायामुळे कस्तूरचंद पार्कचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. परिसरातील भिंतीचे विद्रुपीकरण होत आहे. रोज पदार्थांची विक्री सुरू असल्यामुळे कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य पसरत आहे. व्यवसायासाठी फुकटात जागा मिळाली असली तरी या विक्रेत्यांकडून कधी स्वच्छताही केली जात नाही. हे वास्तव चित्र असतानाही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. ऐतिहासिक वारशाची जपणूक करण्यासाठी आधी अतिक्रमणावर हातोडा मारण्याची गरज आहे.