उद्यापासून अतिक्रमण कारवाईचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:28+5:302021-01-17T04:09:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरातील रस्ते व फूटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सर्व झोनमध्ये सोमवारपासुन एकाच वेळी अतिक्रमण निर्मूलन ...

Encroachment action from tomorrow | उद्यापासून अतिक्रमण कारवाईचा धडाका

उद्यापासून अतिक्रमण कारवाईचा धडाका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील रस्ते व फूटपाथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सर्व झोनमध्ये सोमवारपासुन एकाच वेळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबावा, याची संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपायुक्त महेश मोरोणे यांच्यासह सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहेत.

फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. यातून अपघाताची शक्यता अधिक असल्यामुळे मनपा आयुक्तांनी अतिक्रमण कारवाईचा बडगा उगारला आहे.

अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यासाठी वॉर्ड पथक नियुक्तीच्या सूचनाही दिल्या. पथकात कनिष्ठ अभियंता, स्वच्छता निरीक्षक, सहायक स्थापत्य अभियंता आणि आठ कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्यही अतिक्रमणधारकांना परत करण्यात येणार नाही. या साहित्याचा दर महिन्याला लिलाव करण्यात येणार आहे.

Web Title: Encroachment action from tomorrow