राेजगार सेवकाचा सर्पदंशाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:25+5:302021-01-08T04:23:25+5:30
वेलतूर : विषारी सापाने दंश केल्याने तरुण राेजगार सेवकाचा मृत्यू झाला. ही घटना गाेसेखुर्द प्रकल्पाचे बाधित क्षेत्र असलेल्या तुडका ...

राेजगार सेवकाचा सर्पदंशाने मृत्यू
वेलतूर : विषारी सापाने दंश केल्याने तरुण राेजगार सेवकाचा मृत्यू झाला. ही घटना गाेसेखुर्द प्रकल्पाचे बाधित क्षेत्र असलेल्या तुडका येथे बुधवारी (दि. ६) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.
बादल याेगीराज उके (३०, रा. तुडका, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. बादल कामावर असताना त्यास विषारी सापाने दंश केला. ही बाब लक्षात येताच त्यास वेलतूर येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्यास मृत घाेषित केले. वेलतूर पाेलिसांनी घटनेची नाेंद केली असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृत बादल हा अविवाहित हाेता. महाराष्ट्र ग्रामीण राेजगार याेजनेत ताे राेजगार सेवक म्हणून कामाला हाेता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त हाेत आहे.