‘एम्प्लॉयमेंट कार्ड’ नोंदणी शिबिर
By Admin | Updated: August 20, 2014 01:06 IST2014-08-20T01:06:50+5:302014-08-20T01:06:50+5:30
स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालयात ‘एम्प्लॉयमेंट कार्ड’ नोंदणी आणि नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अमोल देशमुख यांच्या हर्ड फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या

‘एम्प्लॉयमेंट कार्ड’ नोंदणी शिबिर
अमोल देशमुख यांच्यातर्फे आयोजन : पारशिवनीतील तरुणांचा प्रतिसाद
पारशिवनी : स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालयात ‘एम्प्लॉयमेंट कार्ड’ नोंदणी आणि नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. अमोल देशमुख यांच्या हर्ड फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यात ५०० हून अधिक तरुण-तरुणींनी नोंदणी आणि कार्डचे नूतनीकरण केले.
शासकीय नोकरीसाठी ‘एम्प्लॉयमेंट कार्ड’ची गरज भासते. मात्र ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता हर्ड फाऊंडेशनचे प्रबंध संचालक आणि युवा कनेक्ट संकल्पनेचे प्रणेते डॉ. अमोल देशमुख यांनी हे शिबिर आयोजित केले होते. पारशिवनीतील महात्मा गांधी महाविद्यालयात सकाळच्या सुमारास या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर तरुण-तरुणींनी शिबिरस्थळी गर्दी केली. सायंकाळपर्यंत जवळपास ५०० हून अधिक तरुण-तरुणींनी ‘एम्प्लॉयमेंट कार्ड’साठी नोंदणी तसेच कार्ड नूतनीकरणसाठी अर्ज सादर केले.
शिबिरात नोंदणी केलेल्या तरुण-तरुणींना १५ दिवसांनंतर कार्डचे वाटप करण्यात येणार असल्याचे डॉ. अमोल देशमुख यांनी सांगितले.
शिबिराच्या आयोजनासाठी प्रमोद काकडे, सचिन सोमकुवर, सागर सायरे, वासुदेव पाटील, गजानन दोडके, राहुल सावरकर यांच्यासह हर्ड फाऊंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)