‘व्हॉटस् अँप, फेसबुक’मध्ये कर्मचारी व्यस्त

By Admin | Updated: May 26, 2014 01:02 IST2014-05-26T01:02:07+5:302014-05-26T01:02:07+5:30

कामाच्या वेळेत फेसबुक आणि व्हाटस अँपसारख्या सोशल साईट्सवर अपडेट करण्यात व्यस्त असणारे शासकीय कार्यालयातील कर्मचारी अनेक वेळा आलेल्या नागरिकांकडे दुर्लक्ष करतात.

Employees in 'Whatsapp, Facebook' are busy | ‘व्हॉटस् अँप, फेसबुक’मध्ये कर्मचारी व्यस्त

‘व्हॉटस् अँप, फेसबुक’मध्ये कर्मचारी व्यस्त

नागपूर : कामाच्या वेळेत फेसबुक आणि व्हाटस अँपसारख्या सोशल साईट्सवर अपडेट करण्यात व्यस्त असणारे शासकीय कार्यालयातील कर्मचारी अनेक वेळा आलेल्या नागरिकांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे नागरिकांना अधिक वेळ ताटकळत उभे राहावे लागते. सरकारी कार्यालयात आणि कामाच्या वेळेत फेसबुकवर व्यस्त असणार्‍यांवर कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शासकीय कार्यालयाने फेसबुक आणि सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर केल्यास तो भ्रष्टाचार ठरणार असल्याचे मलेशियातील भ्रष्टाचारविरोधी आयोगाने जाहीर केले. याच धर्तीवर आपल्या येथेही शासकीय कार्यालयात फेसबुक वापरणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईची आवश्यकता आहे, अशा भावना शासकीय कार्यालयात येणारे नागरिक व्यक्त करीत आहे, शासकीय कार्यालयात कोणत्याही कामासाठी सर्वसामान्य नागरिकांना दररोज येरझारा माराव्या लागतात.

शासकीय कार्यालय म्हटले की, कामासाठी जाणारा वेळ हेच समोर येते. त्यामुळे अनेक वेळा नागरिक जाण्यासाठी टाळाटाळ करीत असतात. मात्र कधी ना कधी त्यांना कार्यालयात जावे लागतेच. कार्यालयात आल्यावर अनेक वेळ कर्मचारी आपल्या दैनंदिन कामाबरोबर फेसबुक आणि सोशल साईट्सवर अपडेट राहण्यात व्यस्त असतात.

कार्यालयीन वेळेत हे होत असल्याने आपल्याकडेही मलेशियातील भ्रष्टाचारविरोधी आयोगाप्रमाणे कारवाई करण्याची गरज असल्याचे अनेकांनी म्हटले. (प्रतिनिधी)

Web Title: Employees in 'Whatsapp, Facebook' are busy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.