चाचणी, उपाययाेजनांवर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:09 IST2021-03-20T04:09:06+5:302021-03-20T04:09:06+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : दुसऱ्या टप्प्यात काेराेना संक्रमण वाढत आहे. ते नियंत्रणात आणण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काेराेना ...

चाचणी, उपाययाेजनांवर भर द्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : दुसऱ्या टप्प्यात काेराेना संक्रमण वाढत आहे. ते नियंत्रणात आणण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काेराेना चाचणी व प्रतिबंधात्मक उपाययाेजना यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कामठी तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयाेजित आढावा बैठकीत केले. यावेळी त्यांनी आवश्यक सूचनाही केल्या.
कामठी तालुक्यातील महादुका, काेराडी व येरखेडा येथे काेराेना रुग्णांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे त्यांनी तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय माने यांच्याकडून तालुक्यातील विविध गावांमधील काेराेना रुग्णांची संख्या, त्यांची स्थिती, त्या गावांमध्ये आराेग्य विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या उपाययाेजना यांसह अन्य बाबी जाणून घेतल्या. काेराेना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता काेराेना संक्रमितांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबीय व नातेवाइकांची चाचणी करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
काेराेना रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवावे. काेराेना लसीकरणाचा वेग वाढवावा. पाेलीस प्रशासनाने बाजार व इतर ठिकाणी नागरिकांची गर्दी हाेणार नाही याची काळजी घ्यावी. याशिवाय मास्क न वापरणाऱ्यांसह फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या बैठकीत दिले. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्याम मंदनूरकर, तहसीलदार अरविंद हिंगे, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. संजय माने, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, कामठी (नवीन) चे ठाणेदार संजय मेंढे, कामठी (जुनी)चे ठाणेदार विजय मालचे, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. नयना दुपारे, नायब तहसीलदार रणजित दुसावार, सुनील तरोडकर, आर. टी. उके, राजेंद्र माळी, मंडळ अधिकारी महेश कुलदीपवार, संजय अनवने, संजय कांबळे, अमोल पोळ, शेख शरीफ उपस्थित होते.