पेशंटच्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:09 IST2021-03-20T04:09:15+5:302021-03-20T04:09:15+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : कर्मचाऱ्यांना काेराेना लसीकरणासाेबत काेराेना पेशंट व त्यांच्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंगवर विशेष भर द्यावा, अशा सूचना ...

पेशंटच्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : कर्मचाऱ्यांना काेराेना लसीकरणासाेबत काेराेना पेशंट व त्यांच्या काॅन्टॅक्ट ट्रेसिंगवर विशेष भर द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रामटेक तहसील कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (दि. १९) आयाेजित आढावा बैठकीत केल्या. यावेळी त्यांनी रामटेक तालुक्यातील काेराेना संक्रमण, रुग्णांची संख्या, संक्रमण नियंत्रणासाठी केल्या जात असलेल्या उपाययाेजना यासह संबंधित बाबींचा आढावा घेतला.
वाढते काेराेना संक्रमण लक्षात घेता, लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना देत काेराेना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाचा शाेध घेऊन त्यांच्या चाचण्या करा, गृहविलगीकरणात असलेले काेराेना रुग्ण बाहेर फिरत असल्याचे आढळून येताच त्यांच्यावर तसेच विना मास्क फिरणाऱ्यांवर सक्तीने दंडात्मक कारवाई करा, यासह अन्य निर्देश दिले. शिवाय, कंट्राेल रूममधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. काेराेना संक्रमण राेखण्यासाठी महसूल, पाेलीस, पंचायत, आराेग्य व स्थानिक नगर परिषद विभागाने काेणकाेणती कामे कशी करावी, याबाबतही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. शिवाय, नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, रामटेकचे तहसीलदार बाळासाहेब मस्के, पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे, खंडविकास अधिकारी प्रदीप बमनोटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाईकवार, रामटेकचे ठाणेदार प्रमोद मकेश्वर, देवलापारचे ठाणेदार प्रवीण बोरकुटे यांच्यासह रामटेक व पारशिवनी तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी उपस्थित हाेते.