शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कृषी वानिकी योजनांवर भर द्या :  वनराज्यमंत्र्यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 21:19 IST

राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.

ठळक मुद्देकंट्रोल कमांड रूमची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्रीसंजय राठोड यांनी केले.वन राज्यमंत्री म्हणून पदाची सूत्रे स्वीकारल्यावर संजय राठोड यांनी शनिवारी प्रथमच वनभवन कार्यालयाला दिलेल्या भेटीत येथील कंट्रोल कंमाड रूमला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण कार्यालयात फिरून येथील कामकाज जाणून घेतले. अधिकाऱ्यांच्या कक्षांचीही पाहणी केली.बैठकीच्या प्रारंभी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) डॉ. एन. रामबाबू यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. वनभवन येथील कंमाड कंट्रोल रूमविषयक माहिती दिली. प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास) साईप्रकाश यांनी वनविभागाच्या सर्व योजनांच्या आर्थिक बाबीचा आढावा घेणारे सादरीकरण केले. प्रधान मुख्य वनसंरक्षक (माहिती तंत्रज्ञान व धोरण) एम. के. राव यांनी वनविभागाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी सादरीकरण केले. ५० कोटी वृक्ष लागवडीच्या सर्व नोंदीची व जीएसआय प्रणालीची माहिती दिली.यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर आदी उपस्थित होते. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) महिप गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (केंद्रस्थ अधिकारी) संजीव गौड, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अकाष्ट वनोपज) टी. के. चौबे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) शैलेश टेंभूर्णीकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) मोहन कर्नाट, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी.एस.हुडा, मुख्य वनसंरक्षक (प्रा) नागपूर कल्याण कुमार, पेंच व्याघ्र प्रकल्प संचालक गोवेकर, प्रसिद्धी व माहिती अधिकारी (वने) स्नेहल पाटील उपस्थित होत्या. वनभवन येथील आढावा बैठकीनंतर सेमिनरी हिल्स येथील हायटेक नर्सरीचीही त्यांनी पाहणी केली.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडministerमंत्रीforestजंगलFarmerशेतकरी