शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

झोपडपट्टीधारकांना तातडीने मालकी हक्क पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:06 IST

शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासोबतच पट्टेधारकांच्या नावे नोंदणी करण्याच्या संदभार्तील विभागनिहाय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका, सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागांनी समन्वयाने काम करून झोपडपट्टीधारकांना जागेची मालकी देण्याचे काम त्वरित करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

ठळक मुद्दे पालकमंत्र्यांनी घेतला आढावा : शासकीय व महापालिकेच्या जागेवरील पट्टेधारकांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासोबतच पट्टेधारकांच्या नावे नोंदणी करण्याच्या संदभार्तील विभागनिहाय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका, सुधार प्रन्यास तसेच महसूल विभागांनी समन्वयाने काम करून झोपडपट्टीधारकांना जागेची मालकी देण्याचे काम त्वरित करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.हैदराबाद हाऊस येथील सभागृहात दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्काचे पट्टे वाटपासंदर्भातील आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. यावेळी सत्तापक्षनेते संदीप जोशी, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, एनएमआरडीएच्या महानगर आयुक्त तथा सभापती शीतल उगले, मुख्यमंत्री सचिवालयाच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, शशांक दाभोळकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी तसेच नगरसेवक व विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.शहरात २९६ झोपडपट्ट्या घोषित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १५ महपालिकेच्या जागेवर, ५२ नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर, ७७ शासनाच्या जागेवर, ६ रेल्वेच्या जागेवर, मनपा, नासुप्र, रेल्वे आदी मिश्र मालकीच्या जागेवर ८८ तर ५८ खासगी मालकीच्या जागेवर आहेत. त्यातील६८ झोपडपट्ट्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात असून त्यापैकी ४७ झोपडपट्ट्या घोषित झाल्या आहेत. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा कार्यक्रम संपूर्ण शहरात राबविण्यात येत असून नगरसेवकांनी वॉर्डातील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात अर्जासह आवश्यक कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.महापालिकेच्या तकिया-धंतोली व सरस्वतीनगर, फकिरावाडी येथील १७२, रामबाग ३४८, बोरकरनगर, बनसोड मोहल्ला अशा ५३२ झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क पट्टे वाटप करण्यात येत आहेत. त्यापैकी ३५४ पट्टेधारकांना नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच इतरही झोपडपट्टीधारकांनी संपूर्ण कागदपत्रे सादर केली आहेत. उर्वरित झोपडपट्टीधारकांकडून कागदपत्र गोळा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासोबत बोरकरनगर, बसोद मोहल्ला आदी ठिकाणी मालकी हक्काचे पट्टे देऊन रजिस्ट्री करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. रेल्वेच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासंदर्भात रेल्वे विभागाला झोपडपट्टी वसलेल्या जागेसंदर्भात पट्टेवाटप करण्यासाठी जागेचे हस्तांतरण अथवा नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्याची सूचना करताना संबंधित जागेची किंमत रेल्वे विभागाला देण्यासंबंधीचा प्रस्ताव अथवा पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यासंबंधीचा प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही पालकमंत्री बावनकुळे यांनी बैठकीत दिल्यात.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र असलेल्या जागेसंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात यावा. झोपडपट्टीधारकांना पट्टेवाटपासंदर्भातील कारवाई पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून या कामांना गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेnagpurनागपूर