नवोदित कलावंतांनी जिंकले झीनत अमान, सुधाचंद्रन यांचे हृदय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:37+5:302021-02-05T04:47:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लोकमत कॅम्पस क्लब, द्वारका वॉटर पार्क आणि सेंट्रल स्कूलच्या वतीने ‘शहजादे हुनर के’चे प्रोमो ...

Emerging artists won the hearts of Zeenat Aman and Sudhachandran | नवोदित कलावंतांनी जिंकले झीनत अमान, सुधाचंद्रन यांचे हृदय

नवोदित कलावंतांनी जिंकले झीनत अमान, सुधाचंद्रन यांचे हृदय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लोकमत कॅम्पस क्लब, द्वारका वॉटर पार्क आणि सेंट्रल स्कूलच्या वतीने ‘शहजादे हुनर के’चे प्रोमो जाहिरात शुटिंगचे आयोजन द्वारका वॉटर पार्कमध्ये झाले. यावेळी नवोदित कलावंतांनी अभिनेत्री झीनत अमान, प्रसिद्ध नृत्यांगना सुधाचंद्रन यांचे हृदय जिंकले. यावेळी पार्श्वगायिका अबोली गिऱ्हे व चित्रपट दिग्दर्शक संजय पेंडसे, मिस युनिव्हर्स नन्स सिंह प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी सुधाचंद्रन व झीनत अमान यांनी कलावंतांचे कौतुक केले. नागपूरच्या कलावंतात टॅलेण्टेड आहे आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यास मिळाले. अशा कलावंतांना टीव्ही रिॲलिटी शोमध्ये संधी दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

फेम ॲण्ड ग्लोरी इव्हेंट्स प्रा. लि.चे कमलेश क्षीरसागर व श्रुती काळे यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथून आलेल्या कोरियोग्राफर्सनी ३ ते २५ वर्ष वयोगटातील कलावंतांना सात दिवस प्रशिक्षण दिले. व्यवस्थापकीय संचालक शरयू फुकटे व उपाध्यक्ष रोहित फुकटे यांनी आभार व्यक्त केले.

...

Web Title: Emerging artists won the hearts of Zeenat Aman and Sudhachandran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.