शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटाच्या धमकीनंतर विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग

By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 1, 2024 19:25 IST

जबलपूर ते हैदराबाद उड्डाण : तपासणीत आक्षेपार्ह काहीही सापडले नाही

नागपूर : बॉम्ब स्फोटाची धमकी देणारी चिठ्ठी इंडिगोच्या जबलपूर-हैदराबाद विमानात एअर होस्टेसला सापडल्यानंतर या विमानाचे रविवारी सकाळी ९.२२ वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानाच्या तपासणीत आक्षेपार्ह काहीही सापडले नाही. अखेर विमान दुपारी ३.२५ वाजता हैदराबादला रवाना झाले. काही प्रवाशांना बसने हैदराबादला पाठविण्यात आल्याची माहिती आहे. 

या घटनेमुळे प्रवाशांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आणि विमानतळावर भितीचे वातावरण पसरले. प्रवाशांमध्ये बॉम्बची चर्चा होती. विमानतळ प्रशासनाने घटनेची योग्य माहिती न दिल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता. 

प्राप्त माहितीनुसार, एअर होस्टेसला सापडलेल्या चिठ्ठीत ‘ब्लास्ट ९’ असे लिहिले होते. सुरक्षा यंत्रणांनी विमानाची कसून चौकशी केली असता त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. 

बॉम्ब आणि स्फोटाचा संदेश ज्योतिस्मिता सैकिया नावाच्या केबिन क्रूला स्वच्छतागृहात वापरत असलेल्या टॉयलेट रोलच्या तुकड्यावर निळ्या रंगाच्या शाईने लिहिलेला आढळला. या संदेशात केवळ ‘ब्लॉस्ट९’ असे लिहिले होते. वैमानिकाने या घटनेची माहिती नागपूरच्या नियंत्रण कक्षाला सकाळी ८.५६ वाजता दिली. विमानतळाच्या वरिष्ठ विमानतळ संचालकांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविला. सोनेगाव विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शेळके यांना एफआरआरबाबत सूचना देण्यात आल्या.

मुख्यमंत्री सकाळी विमानाने जाणार होते मुंबईलाविमान नागपूर विमानतळावर उतरताच प्रवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि विमानाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेढा घातला. विमानाची बॉम्ब स्क्वाड, श्वान पथक, स्थानिक बॉम्बनाशक पथकाने तपासणी केली. नागपूर विमानतळावरून सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार असल्याने विमानतळ प्रशासन आधीच अलर्टवर होते. याच दरम्यान बॉम्बची अफवा उडाल्याने विमानतळावर खळबळ उडाली.

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळnagpurनागपूर