शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी विमानाचे नागपुरात आपत्कालीन लँडिंग; प्रवासी रुग्णालयात भरती, प्रकृती स्थिर

By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 15, 2024 19:38 IST

चितगांव येथून ओमानला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानात घडला प्रकार

नागपूर : सलाम एअर कंपनीच्या बांगलादेशाच्या चितगांव येथून ओमानला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानात एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्यानंतर विमानाचेनागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. प्रवाशाला किम्स-किंग्जवे रुग्णालयात भरती केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

मोहम्मद खैर (३३) असे रुग्णाचे नाव आहे. उड्डाणादरम्यान त्याची प्रकृती बिघडली आणि तोंडातून फेस येऊ लागला. त्याने तातडीने वैद्यकीय मदत मागितली. वैमानिकाने डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. मान्यतेनंतर विमानाचे लँडिंग करण्यात आले. लँडिंग केल्यावर किम्स-किंग्जवे रुग्णालयाचे डॉ. रुपेश बोकाडे यांच्या नेतृत्वात अन्य डॉक्टरांनी रुग्णाची विमानातच तपासणी केली.

तपासणीदरम्यान प्रवाशाची लक्षणे सामान्य होती. पण तोंडातून फेस आल्याने प्रवाशाला अ‍ॅम्ब्युलन्सने रुग्णालयात तातडीने भरती करण्यात आले. तिथे त्यांच्यावर डॉ. रुपेश बोकाडे उपचार करीत आहेत. सध्या प्रवाशाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाचे महाव्यवस्थापक (कम्युनिकेशन) एजाज शमी यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :airplaneविमानBangladeshबांगलादेशnagpurनागपूर