पीक कर्ज वाटप प्रक्रियेतील जाचक अटी दूर करणार
By Admin | Updated: July 1, 2014 00:59 IST2014-07-01T00:59:51+5:302014-07-01T00:59:51+5:30
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना मागण्यात येणारी जाचक कागदपत्रांची अट शिथिल करण्यास राष्ट्रीयकृत बँकांना सांगण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.

पीक कर्ज वाटप प्रक्रियेतील जाचक अटी दूर करणार
राष्ट्रीयकृत बँका : जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
नागपूर: पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना मागण्यात येणारी जाचक कागदपत्रांची अट शिथिल करण्यास राष्ट्रीयकृत बँकांना सांगण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर झालेल्या मोघेंच्या पत्रकार परिषदेत कृष्णा यांनी ही माहिती दिली.
खरीप हंगामासाठी यंदा नागपूर जिल्ह्याला ७४० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा सहकारी बँक अडचणीत असल्याने या बँकेकडून होणारा कर्ज पुरवठा यंदा राष्ट्रीयकत बँकांकडे वळता करण्यात आला आहे. पीक कर्जापोटी ३७० कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले . गेल्या वर्षी जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या व यंदा राष्ट्रीयकृत बँकेकडे कर्जासाठी अर्ज करणाऱ्या सरासरी १० हजार शेतकऱ्यांपैकी ७ हजार ६०० शेतकऱ्याना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आॅगस्ट-सप्टेंबरअखेरपर्यंत कर्ज वाटपाचे उदिष्ट पूर्ण करण्यात येईल, असे कृष्णा यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीयकृत बँकेकडे कर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची मागणी केली जाते व त्यासाठी त्यांचे अर्ज नाकारले जातात, याकडे कृष्णा यांचे लक्ष वेधले असता शेतकऱ्यांकडून केवळ आवश्यक कागदपत्रेच मागावी, अशा सूचना लीड बँकेला देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)