शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नागपुरात सीएए- एनआरसी विरोधात महिलांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 20:59 IST

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंंदणी (एनसीआर) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनपीआर) याच्या विरोधात सध्या देशभरात आंदोलन सुरु आहे. सोमवारी नागपुरातील महिलांनीही या कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारला.

ठळक मुद्देसंविधान चौकात भव्य आंदोलन : कायदा रद्द होत नाही तोवर लढण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंंदणी (एनसीआर) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनपीआर) याच्या विरोधात सध्या देशभरात आंदोलन सुरु आहे. सोमवारी नागपुरातील महिलांनीही या कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारला. हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. जोवर हा कायदा रद्द होत नाही, तोपवर लढण्याचा संकल्प केला. संविधान चौकात करण्यात आलेल्या या एक दिवसीय धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने महिलांसह पुरुषही सहभागी झाले होते.

नागपुरातील विविध महिला संघटनांनी एकत्र येऊन सामुहिक नेतृत्वात ‘आम्ही भारताचे लोक’ या बॅनर अंतर्गत हे आंदोलन केले. हा कायदा देशाच्या प्रत्येक नागरिकाविरुद्ध आहे. संविधानाविरुद्ध आहे. देशातील समता, स्वातंत्र्य व बंधुता नष्ट करणारा आहे. तेव्हा हा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरुद्ध जोरदार नरेबाजीही करण्यात आली. याप्रसंगी अनेक महिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त करीत हा कायदा कसा देशविघातच आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. संविधानाच्या प्रास्ताविक वाचन करून आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी क्रांतिकारी गीतेही सादर करण्यात आली. 
आंदोलनात छाया खोब्रागडे, तक्षशीला वाघधरे, अ‍ॅड. स्मिता कांबळे, संध्या राजूरकर, वंदना जीवने, उषा बौद्ध, डॉ. सरोज आगलावे, सांची जीवने, रेखा बारहाते यांच्यासह संजीवनी सखी मंच, बौद्ध रंगभूमी, द रिपब्लिकन, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन महिला ट्रस्ट, संबुद्ध महिला संघटना, समता सैनिक दल, दीक्षाभूमी धम्म महिला समिती, अ.भा. सत्यशोधक महिला, संबोधिनी महिला संघटना, आदिम संविधान संरक्षण समिती, अनाथपिंडक परिवर, मुस्लीम महिला परिषद, ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह वुमेन ऑर्गनायझेशन, सुगतनगर महिला सामाजिक बहुउद्देशीय संस्था, लुंबिनी बहुउद्देशीय महिला मंडळ, जिजाऊ ब्रिगेड, सुजाता महिला मंडळ, बीआरएसपी महिला आघाडी, भीमोदय महिला मंडळ, संघर्ष वाहिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी परिषद, विदर्भ तेली समाज महासंघ, बापूजी महिला कल्याण बहुउद्देशिय संस्था, संजीवनी लोकशिक्षण मंडळ, कुणबी महिला समिती, शारदा महिला मंडळ, सोनेरी पहाट, धनोजी कुणबी महिला समाज, जीवन आश्रम सेवा संस्था आदींसह विविध समाजातील महिला संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.जेएनयूवरील हल्ल्याचा निषेधआंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध नोंंदवण्यात आला. यातील आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकWomenमहिलाagitationआंदोलन