शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या अंमलबजावणीसाठी नागपुरात संघटनांचा एल्गार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:43 IST

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुशेष भरला जात नाही. यासोबतच माासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजनांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमच्या पुढाकाराने विविध संघटणांच्या सहकार्याने बुधवारी संविधान चौक येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.

ठळक मुद्देलाक्षणिक धरणे आंदोलन : शिष्यवृत्ती , अनुशेषासह मागासवर्गीयांच्या योजनांच्या अंमलबजावणीकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळत नाही आहे. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या अनुशेष भरला जात नाही. यासोबतच माासवर्गीयांच्या विविध कल्याणकारी योजनांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ऑफीसर्स फोरमच्या पुढाकाराने विविध संघटणांच्या सहकार्याने बुधवारी संविधान चौक येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. संविधानाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली.धरणे आंदोलनानंतर मागणीचे निवेदन विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले. या निवेदनात मागासवर्गीयांना शिष्यवृत्ती वाटप करण्यासोबतच ज्या शैक्षमिक संस्था यात सहकार्य करीत नाही, त्यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करावे, महाराष्ट्रात शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादा ८ लक्ष करण्यात यावी, विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर कराव्यात, अनुसूचित जातीच्या बजेटटची प्रभावी अंमलबजावणी करावी, आरक्षित पदांचा अनुशेष भरण्यात यावा, अ‍ॅट्रोसिटी कायद्यबाबत असलेला गैरसमज दूर करावा, याशिवाय स्वाभीमान योजना, रमाई घरकुल योजना प्रभावीपणे राबवण्यात याव्यात, आदी मागण्यांचा समावेश होता.या आंदोलनात ई.झेड. खोब्रागडे, शिवदास वासे, पी.पी. वाटील, डॉ. जयराम खोब्रागडे, पी.आर. पुडके, राजरतन कुंभारे, मनोहर मेश्राम, विलास सुटे, अशोक गेडाम, धर्मेश फुसाटे, प्रा. मेहेंद्रकुमार मेश्राम, सिद्धार्थ हस्ते, किशोर चौधरी, मिलिंद बन्सोड, निर्गंनश: ठमके, व्ही.व्ही. मेश्राम, सच्चिदानं दारुंडे, डॉ. पूरण मेश्राम, डॉ. शरद माटे, एम.एम. आत्राम, आकाश मून, रेखा खोब्रागडे, शितल गणवीर, अतुल खोब्रागडे, नरेश मेश्राम, हंसराज भांगे, डॉ. गौतम कांबळे, साहेबराव सिरसाट, आर.एस. आंबुलकर, रामभाऊ बागडे, संघदीप उके आदींसह बानाई, डॉ. आंबेडकर अ‍ॅग्रोकोज असोसिएशन ऑफ इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडंंट फेडरेशन, महाराष्ट्र युनिर्व्हसिटीज ऑफीसर्स फोरम, कस्ट्राईब कर्मचारी महासंघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायजेशन, दी शेड्युल्ड कास्ट अ‍ॅण्ड बुद्धिस्ट पेंशनर्स, सामाजिक न्याय कर्मचारी संघटना, जागृत नागरिक मंच, बहुजन हिताय संघ, वंदना संघ दीक्षाभूमी, दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती, समता सैनिक दल, मैत्रिणी, संजीवनी सखी मंच, मनपा मागासवर्गीय कर्मचारी संघटना, आम्रपाली महिला मंडळ, राष्ट्रीय परिवारिक धम्म संगोष्टी बौद्ध महिला मैत्री संघ, सम्यक संकल्प संघ आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर