शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यंदाही अकरावीच्या जागा राहणार रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:09 IST

नागपूर : सातत्याने पाचव्या वर्षीही शहरातील अकरावीच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार असल्याची ओरड संस्थाचालकांची आहे. केंद्रीय प्रवेश समितीद्वारे ...

नागपूर : सातत्याने पाचव्या वर्षीही शहरातील अकरावीच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहणार असल्याची ओरड संस्थाचालकांची आहे. केंद्रीय प्रवेश समितीद्वारे सुरू असलेल्या अकरावीच्या प्रवेशासाठी आतापर्यंत २५५०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे शहरात २१७ ज्युनि. कॉलेजमध्ये अकरावीच्या ५८७९५ जागा आहे आणि आज प्रोव्हिजनल जनरल मेरीट लिस्ट लागणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. लागलीच शिक्षण संचालनालयाने नागपूरसह राज्यातील सहा जिल्ह्यांतील केंद्रीय प्रवेश समितीला प्रक्रियेचे वेळापत्रक आखून दिले. १४ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांच्या नोंदणीला सुरुवात झाली. २२ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करायची होती. त्यानुसार २१ ऑगस्टपर्यंत झालेल्या नोंदणीनुसार २५५१२ विद्यार्थ्यांनी अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी केली होती.

- जागेपेक्षा विद्यार्थीच कमी

नागपूर शहरात स्टेट बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३४ हजारांच्या जवळपास आहे. त्याचबरोबर सीबीएसईचे शहरातून किमान पाच हजारांच्या जवळपास विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होतात. इतर सर्व बोर्ड मिळवून ४० हजारांच्या जवळपास विद्यार्थी उत्तीर्ण होतात आणि अकरावीच्या जागा ५८ हजारांवर आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने जागा रिक्त राहत आहे.

- एकूण जागा - ५८७९५

कला शाखा - ९४२०

वाणिज्य शाखा - १७७२०

विज्ञान शाखा - २७६४०

एमसीव्हीसी - ४०१५

- एकूण नोंदणी - २५५१२

भाग १ लॉक - २२१५९

तपासणी झालेले - २१४६५

ऑप्शन भरलेले - १७१४९

- केंद्रीय प्रवेश समितीद्वारे फक्त शहरात प्रवेश दिले जातात. ग्रामीणमध्ये कॉलेजही सुरू झाले आहे. ट्युशनशी टायअप असलेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहे. आयटीआय आणि पॉलिटेक्निकलासुद्धा विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवेश घेतात. त्यामुळे यंदा किमान ५० टक्के जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम म्हणून मोठ्या संख्येने शिक्षण अतिरिक्त ठरणार आहे.

रवींद्र फडणवीस, सचिव, राज्य शिक्षण संस्था महामंडळ