शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

बंदिवास आता पुरे झाला; कळप निसर्गाकडे निघाला, कशाला उलटा फिरविता...

By shrimant maney | Updated: January 23, 2022 11:39 IST

हत्ती हा भारतीय संस्कृतीमधील आगळावेगळा प्राणी. कधीकाळी सत्तेचं प्रतीक असलेल्या या प्राण्याला अनेक पांत आपण पाहतो. आता तो स्वत:ची बायोमेट्रिक ओळखही घेऊन आला आहे.

श्रीमंत माने, कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूर

सत्ता व डामडौलाचे प्रतीक असलेला हत्ती पूर्वी राजेमहाराजांच्या दरबारात दिमाखात मिरवायचा. राजाच्या सिंहासनाच्या बाहूचे तोंड सिंहाचे असले तरी त्याचे पाय हस्तीदंताचे असायचे. हस्तीदंताचा वापर ज्या साम्राज्यात अधिक ते साम्राज्य वैभवशाली मानले जायचे. आता राजेशाही संपली. लोकशाही आली. आता हत्तीचे दर्शन देवादिकांच्या मिरवणुकीत होते. सजवलेले हत्ती भक्तीची शोभा वाढवतात. हस्तीदंती वस्तू आता धनवानांच्या दिवाणखाण्याची शोभा वाढवतात, तर बड्या उद्योगांना आता त्यांच्या प्राणीसंग्रहालयांमध्येही हत्तींची डोलदार चाल हवी असते. 

हत्ती हा भारतीय संस्कृतीमधील आगळावेगळा प्राणी आहे. तो कधी गणपतीच्या रूपाने श्रद्धेची पखरण करतो तर बहुतेक सगळी मंदिरे व देवस्थानांना वाटते, की देवाच्या दारावर हत्ती डोलावेत. हत्तीची अशी कितीतरी रूपे आहेत. लीळाचरित्रातील हत्ती व सात आंधळे असाच हा प्रकार आहे. हत्तींची डोलदार वाटचाल आता देशातल्या प्रत्येक हत्तीला एक बायोमेट्रिक ओळख प्रत्येकाला युनिक आयडेंटिटी नंबरपर्यंत येऊन पोहोचली आहे.

हत्तीकौशल्याला मोठी, जुनी परंपरा...

- जंगलकामांसाठी, लाकडाचे ओंडक व इतर जड सामान वाहून नेण्यासाठी ब्रिटिशांनी १८४० मध्ये भारतात सर्वप्रथम हत्तींचा वापर सुरू केला, असे मानले जात असले तरी तज्ज्ञांचे मत त्याहून वेगळे आहे. इंग्रज भारतात येण्यापूर्वीच हत्तींचा असा वापर, जंगली हत्तींना पकडणे, पाळणे, माणसाळणे होत असायचे.

- दक्षिण भारतात तमिळनाडू, केरळ व कर्नाटकातील कुरूबा, जैनू कुरूबा, हिल कुरूबा, बेट्टा या जमातींमध्ये हे हत्तींसंदर्भातील वेगळे कौशल्य व वैशिष्ट्य परंपरेने सांभाळले गेले. आजही या राज्यांमधील माहुत प्रामुख्याने याच जमातींचे आहेत.

- केरळमधील अण्णामलाई पर्वतरांगांमध्ये अशाच पद्धतीने मन्नार, मल्लासर या समुदायातील माहुतांचा भरणा आहे, तर कर्नाटकमध्ये हे हत्ती सांभाळण्याचे काम स्थानिक आदिवासींसोबतच बंगालमधून स्थलांतर केलेल्या मुस्लीम व्यक्ती करतात.

- ईशान्य भारताचा हत्तींशी संबंध खूप जुना आहे. त्यामुळेच दक्षिण भारताप्रमाणे त्याही भागात विशिष्ट समुदायांमध्ये हत्ती पकडण्यापासून ते त्यांच्याकडून विविध कामे करून घेण्यापर्यंत परंपरागत कौशल्य अहोम व राभा या जमातींमध्ये विकसित झाले.

- हत्ती त्याच्या पोटातून दहा प्रकारचे घुमारायुक्त आवाज काढतो. जॉईस पुली हिने या आवाजांची नोंद केली आहे. यातील बार्क (भुंकणे), क्राय (रडणे), ग्रंट (गोंधळाचा आवाज), हस्की क्राय (विचित्र रडल्यासारखा आवाज), रेव्ह (धांगडधिंगा केल्यासारखा आवाज), रोअर (गर्जना) आणि रम्बलिंग (पोटातून येणारा घुमारायुक्त आवाज) हे सात आवाज माणसाला ऐकूच येत नाहीत.

- हत्तींचे जे तीन आवाज माणसाला ऐकू येतात. त्यापैकी एक ‘ट्रंपेट’ (बिगुल वाजविल्यासारखा). दुसरा ‘नेझल ट्रंपेट’ (नाकावाटे काढलेला आवाज). तिसरा ‘स्नोर्ट’ (रणशिंग फुंकल्यासारखा). 

- हत्तीचे रम्बलिंग दुसरा हत्ती सात किलोमीटरच्या परिघात ऐकू शकतो इतके हत्तीचे कान तीक्ष्ण असतात. माणसाला ऐकू येत नाही असा ध्वनी ते काढू व ऐकू शकतात. दोन जाड भिंतींच्या आत हत्ती ठेवले तरी ते एकमेकांशी संवाद साधू शकतात.

- कमलापूरच्या जंगलात आज  जे हत्ती फिरतात, त्या सर्वांना येथे पाण्याचे साठे कोठे आहेत याची माहिती आहे. यांची पुढची पिढी काही वर्षांनी या जंगलात जेव्हा येईल तेव्हा ते बरोबर या पाणी साठ्यांकडे जातील. कारण ती मेमरी अनुवंशिकपणे आई, वडिलांकडून पुढील पिढीकडे जाते. 

- पूर्ण शरीर जमिनीवर लोळवून हत्ती केवळ तीन-चार तासच झोपतात. इतरवेळी उभ्या, उभ्याही झोपतो. .

- हत्ती जेव्हा माजावर येतात त्या रागीट काळात हत्तीचे डोळे व कान याच्या मधोमध गंडस्थळातून द्रव स्त्रवतो.  मादी समागमाला तयार आहे की, नाही हे नर हत्ती तिच्या लघवीच्या वासावरुन ठरवितो. लहान नर पूर्ण वयात आल्याशिवाय मोठे नर त्यांना समागम करु देत नाहीत. मादीही अशा नरांपासून दूर राहतात. एका अर्थाने हत्तींच्या कळपात आपसात लैंगिक शिक्षण चांगले असते.

कळप निसर्गाकडे निघाला, कशाला उलटा फिरविता...

- भारत सरकारने धाेरण म्हणून आता हत्तींना बंदिस्त ठेवता येणार नाही असे धोरण स्वीकारले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्राणी संग्रहालये तसेच सर्कशींमधील हत्तींना नैसर्गिक वातावरणात पाठविण्याची एक माेहीमच राबविण्यात आली. हळूहळू सगळे हत्ती नैसर्गिक अधिवासात पाठविण्यात येत आहेत.

- हत्ती व माणूस यांच्यातील संघर्ष जुना व गंभीर आहे. जगभरातील सर्वाधिक मानव-हत्ती संघर्ष भारतात आढळून येतो. साधारणपणे वर्षाकाठी दोनशे ते अडीचशे माणसे आणि सरासरी शंभर हत्तींचा या संघर्षात मृत्यू होतो, असे आकडेवारी सांगते.

- केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने २३ सप्टेंबर २०२० ला लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, २०१९ पर्यंतच्या पाच वर्षांत देशात हत्तींच्या हल्ल्यात २३०० व्यक्तींचा मृत्यू झाला. वाघांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या तुलनेत ही संख्या दहापट आहे. याच काळात चारशे हत्तीही मारले गेले. बहुतेक हत्तींचा मृत्यू तस्करीसाठी झाल्याचा संशय आहे.

- ऑक्टोबर २०२० मध्ये केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षण कायद्यात दुरुस्ती करून हत्तींनाही वाघांप्रमाणेच संरक्षण दिले आहे. आधीच्या वर्षी राष्ट्रीय हत्ती कृती योजना तयार करण्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले होते. तिच्या शिफारशींवरून ही दुरुस्ती करण्यात आली.

- जगात आफ्रिकन व आशियाई अशा हत्तींच्या दोन प्रमुख प्रजाती आहेत आणि आशियाई प्रजातींपैकी ६० टक्के हत्ती भारतात आहेत. त्यांच्या रक्षणासाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. आकार, सरासरी आयुर्मान आदींबाबत सर्वांत मोठा प्राणी अशी ओळख असलेल्या हत्तींना नैसर्गिक अधिवास देणे, हा या उपायांचा केंद्रबिंदू आहे.

- गेली किमान वीस वर्षे भारतात दर चार-सहा वर्षांनी हत्तींची गणना होत असली तरी खऱ्या अर्थाने व्यापक हत्तीगणना २०१७ मध्ये १२ ऑगस्टला झाली. तिच्या अहवालानुसार, २३ राज्यांमध्ये मिळून देशात २७ हजार ३१२ हत्ती आहेत. यात जंगली, तसेच पाळीव हत्तींचा समावेश आहे.

- सर्वाधिक ६०४९ हत्ती कर्नाटकमध्ये, त्याखालोखाल ५७१९ आसाममध्ये, ३०५४ केरळमध्ये, १८३९ हत्ती उत्तराखंडमध्ये असल्याचे या हत्तीगणनेने स्पष्ट झाले. दहा वर्षांआधीच्या २००७च्या पाहणीतही देशात जवळपास २७ हजार हत्ती असल्याचे आढळले होते. सध्या देशात तीस हजार हत्ती असावेत.

- जंगली हत्तीप्रमाणेच पाळीव हत्तींचे प्रमाण देशात मोठे आहे. सन २०००च्या सर्वेक्षणानुसार देशात ३४०० पाळीव हत्ती होते. त्यापैकी २५४० हत्ती खासगी मालकीचे, १९० देवस्थान व मंदिरांच्या मालकीचे, ४८० वनखात्याकडे, तर १५० प्राणीसंग्रहालये व सर्कशीमध्ये होते.

- झारखंडमध्ये २००१ साली पहिला हत्ती प्रकल्प घोषित झाला. त्यानंतर २००५ मध्ये ११ प्रमुख जंगलांमध्ये २१ हजार ३०० जंगली हत्तींचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले. २००९ मध्ये प्राणी संग्रहालय व सर्कशींमधील क्रौर्य टाळण्यासाठी हत्तींना नैसर्गिक अधिवासात नेण्याचे धाेरण ठरले.

- अगदी अलीकडे देशातील जंगली व पाळीव अशा प्रत्येक हत्तीची बायोमेट्रिक ओळख तयार करून त्यांना एक युनिक आयडेंटिटी नंबर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.     वाघांनंतर हत्ती हा असा यूआयएन मिळविणारा दुसरा प्राणी ठरला आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnagpurनागपूर