शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

धनत्रयोदशीला इलेक्ट्रॉनिक्स, सराफा, ऑटोमोबाईल, कापड बाजारात उत्साह

By मोरेश्वर मानापुरे | Updated: November 10, 2023 20:15 IST

बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी झुंबड

नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या धनत्रयोदशीला सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, कापड आणि ऑटोमोबाईल बाजारात ग्राहकांची झुंबड होती. लोकांनी खऱ्या अर्थाने धनत्रयोदशीलाच लक्ष्मीपूजनाचे फटाके फोडले. शुक्रवारी बाजारात सर्वच बाजारपेठांमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली. 

ग्राहकांचा उत्साहाने उलाढालीचा आकडा वाढलासराफा व्यापारी म्हणाले, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे दागिने आणि चांदीची उपकरणे खरेदीसाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. गर्दीपासून बचावासाठी लोक सकाळपासूनच सराफांच्या दुकानात आले. सर्वांनीच आवडीच्या डिझाईनचे दागिने आणि सोने व चांदीचे नाणे खरेदी केले. तर बुकिंग केलेले दागिने घरी नेले. सोन्याच्या भावाचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. लोकांनी उत्साहात खरेदी केली. सराफांकडे सुरू असलेल्या विविध योजनांना फायदा घेतला. नागपुरातील २ हजारांहून अधिक सराफा दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होती. लोकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचे सराफांनी सांगितले.इलेक्ट्रॉनिक्स दुकानांमध्ये गर्दीश्रीकांत भांडारकर म्हणाले, धनत्रयोदशीला लोक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडले. लोकांनी मुहूर्त साधून मनमुराद खरेदी केली. सर्वच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मागणी होती. ग्राहकांच्या स्वागतासाठी संचालकांनी शोरूमची आकर्षक सजावट केली होती. नामांकित कंपन्यांचे एलईडी, वॉशिंग मशीन, फ्रिज, मायक्रोवेव्ह ओव्हन, मोबाईल, लॅपटॉप याशिवाय ग्राहकोपयोगी उपकरणांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. ग्राहकांनी विविध कंपन्यांच्या फायनान्स योजनांचा फायदा घेतला. सर्वाधिक मागणी एलईडी, फ्रिज आणि वॉशिंग मशीनला होती. दिवाळीनिमित्ताने नामांकित कंपन्यांनी सुरू केलेल्या योजनांचा फायदा ग्राहकांना मिळाला. नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात कोट्यवधींची उलाढाल झाली.

ऑटोमोबाईल क्षेत्रातही उत्साहऑटोमोबाईल क्षेत्रातही उत्साह होता. दसऱ्यानंतर या दिवशी दुचाकी आणि चारचाकीची सर्वाधिक विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. आधीच बुकिंग केलेल्या गाड्या लोकांनी घरी नेल्या. विविध दुचाकी व चारचाकी कंपन्यांच्या योजनांचा ग्राहकांनी फायदा घेतला. 

इतवारी, गांधीबागेत सर्वच दुकाने ‘फूल्ल’इतवारी, गांधाबाग, तीननल चौकातील रेडिमेड गारमेंट आणि साड्यांची दुकाने ‘फूल्ल’ होती. ग्राहकांना पाय ठेवायलाही जागा नव्हती. सर्वजण कुटुंबीयांसह खरेदीसाठी आले होते. याशिवाय सजावटीच्या दुकानातही गर्दी पाहायला मिळाली. एकंदरीत बाजारपेठांमध्ये खरेदीची प्रचंड उत्साह दिसून आला.