शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
4
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
5
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
6
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
7
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
8
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
9
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
10
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
11
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
12
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
13
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
14
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
15
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
16
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
17
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
18
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
19
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
20
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...

नागपुरात मेंटेनन्सच्या नावावर ७ तास वीज बंद राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 23:45 IST

महावितरणचे मेंटेनन्सचे काम संपायचे नावच घेत नाही आहे. या आठवड्यात बुधवारी कंपनीने वर्धमाननगर परिसरात सात तास वीज बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देबुधवारी महावितरण देणार ‘शॉक’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणचे मेंटेनन्सचे काम संपायचे नावच घेत नाही आहे. या आठवड्यात बुधवारी कंपनीने वर्धमाननगर परिसरात सात तास वीज बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. या आठवड्यात मेंटेनन्सच्या नावावर वीज बंद ठेवणे आता चर्चेचा विषय झाला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, जेव्हा वीज वितरण यंत्रणा इतकी देखभाल दुरुस्ती करीत आहे तर शहरात अचानक वीज बंद का होत असते. दर आठवड्यात मेंटेनन्सनंतरही वीज वितरण यंत्रणेची कार्यपद्धती किती ढेपाळलेली आहे याचे उदाहरण महाराजबाग, अमरावती रोड परिसरात आजही स्पष्ट दिसून आले. या परिसरात दिवसभरात दोन ते तीन वेळा वीज बंद राहिली. यावर कंपनीचे म्हणणे आहे की, तांत्रिक कारणामुळे वीज बंद राहिली. परंतु दर आठवड्यात मेंटेनन्स केल्यानंतरही असे का होते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.दरम्यान, अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीसाठी बुधवार १८ मार्च रोजी वर्धमान नगर आणि परिसरातील वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील, असे महावितरणने जाहीर केले आहे. बुधवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत अमरावती रोड, बोखारा आणि गोधनी उपकेंद्रातील सर्व भाग, फेटरी, खरबी, वाडी शहर फीडर,चिंचभवन फीडर, सकाळी ९ ते १२ या वेळेत सहकारनगर, नरकेसरी ले-आऊट, लावा, खडगाव, हिंदुस्तान कॉलनी अमरावती रोड फीडर, अत्रे ले आऊट फीडर, धंतोली फीडर, सुभाष नगर फीडर, सकाळी ८ ते १० या वेळेत अपना भांडार फीडर, सीताबर्डी, दवलामेटी फीडर, सकाळी ८ ते ११ या वेळेत कर्वेनगर फीडर, हुडकेश्वर फीडर, नरसाळा रोड, मालवीय नगर फीडर येथील वीज पुरवठा बंद राहील. वैशालीनगर आणि कमाल टॉकीज फीडरवर एकात्मिक रस्ते विकास योजनेतील कामे पूर्ण करण्यासाठी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वीज पुरवठा बंद राहील.

टॅग्स :mahavitaranमहावितरणPower Shutdownभारनियमन