वीज ग्राहकांकडे १ अब्ज १४ कोटींची थकबाकी
By Admin | Updated: May 25, 2014 00:49 IST2014-05-25T00:49:51+5:302014-05-25T00:49:51+5:30
वीज वितरण कंपनी सध्या खासगी वीज निर्मिती कंपन्यासोबत स्पर्धा करताना कंपनीतील थकबाकीतून कसा मार्ग काढायचा, या विवंचनेत गुंतली आहे. अशातच वीज वितरण कंपनीची नागपूर ग्रामीण

वीज ग्राहकांकडे १ अब्ज १४ कोटींची थकबाकी
पाच जिल्हे : वसुलीचे आव्हान प्रवीण खिरटकर - वरोरा वीज वितरण कंपनी सध्या खासगी वीज निर्मिती कंपन्यासोबत स्पर्धा करताना कंपनीतील थकबाकीतून कसा मार्ग काढायचा, या विवंचनेत गुंतली आहे. अशातच वीज वितरण कंपनीची नागपूर ग्रामीण भागातील पाच जिल्ह्यातील २ लाख ४६ हजार ५७५ ग्राहकांकडे तब्बल १ अब्ज १४ कोटी ९ लाख ६५ हजार १२५ रुपयांची कायमस्वरूपी थकबाकी आहे. ही थकबाकी कायम स्वरूपी असल्याने ते वसूल करण्याचे आव्हान वीज वितरण कंपनी पुढे उभे ठाकले आहे. विद्युत गळती, वीज चोरी, यावर वीज वितरण कंपनीने विविध प्रकारचे पथके तयार करून बर्याच प्रमाणात आळा बसविला आहे. अनेक भागातील भारनियमनही बंद करण्यास वीज वितरण कंपनीला यश आल्याचे दिसून येत आहे. असे असताना ग्राहकांकडे असलेली थकबाकी काढण्याचे आव्हान वीज वितरण कंपनीसमोर आहे. नागपूर ग्रामीण भागातील पाच जिल्ह्यात वीज वितरण कंपनीचे कायमस्वरूपी थकीतदार दिवसागणीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात भंडारा जिल्ह्यात ३९,७९७ ग्राहकाकडे १३ कोटी ७५ लाख ९२ हजार 0५३ रु., चंद्रपूर जिल्ह्यात ५१,९0६ ग्राहकाकडे २३ कोटी ११ लाख ५९ हजार ६६ रु., गडचिरोली जिल्ह्यात ४४,३५0 ग्राहकांकडे १५ कोटी ४१ लाख ३४ हजार २५२ रुपये, गोंदिया जिल्ह्यात ५४,८६४ ग्राहकांकडे ३१ कोटी १८ लाख ७९ हजार २४७, वर्धा जिल्ह्यात ५५,६५८ ग्राहकांकडे ३0 कोटी ६२ हजार ५0७ रुपये अशी एकूण एक अब्ज १४ कोटी नऊ लाख ६५ हजार रुपयांची कायमस्वरूपी थकबाकी आहे. यातील काही ग्राहकांना कंपनीने थकबाकी वसूल करण्याविषयी नोटीसही बजावल्या आहेत. तर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. कायमस्वरूपी थकबाकी असणार्या ग्राहकांना थकबाकी अदा केल्याशिवाय नवीन कनेक्शन मिळणार नाही, असा वीज वितरण कंपनीचा नियम आहे. वीज वितरण कंपनी ग्राहकांना सणासुदीच्या दिवसात वीज मिळावी म्हणून बाजारपेठेतून महागडी वीज घेऊन ग्राहकांना वीज पुरवठा करते. याकरिता वेगळे शुल्क आकारत नाही. यासोबतच कृषी पंप बिपीएलधारकांना सवलतीच्या दरात वीज दिली जाते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वीज बिल थकित असल्याने कंपनीचे दिवाळे निघत आहे. (तालुका प्रतिनिधी)