शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खापरखेड्यात विजेचे रेकॉर्ड उत्पादन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:00 IST

महाजेनकोच्या खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक पाचने सलगपणे २०० दिवस विजेचे उत्पादन करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. हा रेकॉर्ड मंगळवारी रात्री ११.५० मिनिटांवर झाला. ५०० मेगावॅट क्षमतेच्या या युनिटने ३० नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंत सलग न थांबता अखंडित विजेचे उत्पादन केले.

ठळक मुद्देसलग २०० दिवस केले उत्पादन 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाजेनकोच्या खापरखेडा येथील औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक पाचने सलगपणे २०० दिवस विजेचे उत्पादन करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. हा रेकॉर्ड मंगळवारी रात्री ११.५० मिनिटांवर झाला. ५०० मेगावॅट क्षमतेच्या या युनिटने ३० नोव्हेंबर २०१८ पासून आजपर्यंत सलग न थांबता अखंडित विजेचे उत्पादन केले.महाजेनकोच्या चंद्रपूर, खापरखेडा आणि भुसावळ औष्णिक वीज केंद्रात ५०० मेगावॅट क्षमतेचे एकूण ८ युनिट कार्यरत आहेत. यात चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रातील युनिट क्रमांक -७ ने १७२.५ दिवस विजेचे उत्पादन करण्याचा रेकॉर्ड बनवला होता. २७.५ दिवसापूर्वीच खापरखेडाच्या युनिट क्रमांक ५ ने हा रेकॉर्ड तोडला होता. आता काल मंगळवारी युनिट क्रमांक ५ ने सलग २०० दिवस उत्पादन करण्याचा नवीन रेकॉर्ड नोंदवला आहे. वीज केंद्राचे मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी सांगितले की, युनिट अजूनही आपल्या क्षमतेच्या ९० टक्के विजेचे उत्पादन करीत आहे.आता २५० दिवसाचे लक्ष्यमहाजेनकोचे प्रबंध निदेशक अरविंद सिंह, संचालक (संचालन) चंद्रकांत थोटवे यांनी युनिटचे अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. ही युनिट सलग २५० दिवस उत्पादन करण्याचा रेकॉर्डही करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांनी उपमुख्य अभियंता राजेंद्र राऊत आणि त्यांच्या टीमचे यासाठी अभिनंदन केले आहे.ऊर्जामंत्र्यांनी दिले अभियंते-कर्मचाऱ्यांना श्रेयऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या यशाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन व खापरखेडा केंद्राचे अभियंता व कर्मचाऱ्यांना दिले आहे. ते म्हणाले , या श्रेयामुळे कर्मचाऱ्यांचे परिश्रम दिसून येतात. यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांसह सर्वांचेच अभिनंदन करीत असेच यश पुढेही मिळत राहील. २५० दिवस सातत्याने उत्पादनाचे लक्ष्यही गाठता येईल, असा विश्वासही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर