नागपूर ग्रामीणमधील वीज देयक भरणा केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 01:50 AM2020-05-23T01:50:21+5:302020-05-23T01:52:52+5:30

कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्च-२०२० पासून बंद करण्यात आलेले महावितरणचे वीज भरणा केंद्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे.

Electricity payment center started in rural Nagpur | नागपूर ग्रामीणमधील वीज देयक भरणा केंद्र सुरू

नागपूर ग्रामीणमधील वीज देयक भरणा केंद्र सुरू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मार्च-२०२० पासून बंद करण्यात आलेले महावितरणचे वीज भरणा केंद्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे यांनी दिली आहे.
वीज ग्राहकांना देयकाची रक्कम भरण्यास अडचण होत असल्याची बाब महावितरणकडून जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करून देण्यात आली होती. किमान ग्रामीण भागात वीज ग्राहकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी येथील वीज देयक केंद्र सुरू करण्यासाठी महावितरणने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाने २१ मे २०२० पासून केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्देशित केलेल्या मानकांचे पालन करून वीज देयक भरणा केंद्र सुरू करण्याची रीतसर परवानगी दिली आहे. यानुसार येथे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील वीज ग्राहक आपल्या वीज देयकाची रक्कम भरू शकतील.
महावितरणकडून सध्या छापील देयकाची प्रत वितरित करणे बंद केले आहे. यामुळे वीज ग्राहकांनी आपल्या मोबाईलवर आलेला एसएमएस वीज बिल भरणा केंद्रावर दाखवून देयकाची रक्कम भरण्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
या अनुषंगाने शासनाने जारी केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करून केंद्र सुरु करावे. वीज देयक भरणा केंद्रावर सोशल डिस्टन्सचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी तसेच स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्व ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करावी अशा सूचना यावेळी महावितरणकडून दिल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या वीज ग्राहकांनी सुरू असलेल्या वीज बिल भरणा केंद्रावर जाऊन थकबाकी असलेल्या देयकाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Web Title: Electricity payment center started in rural Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.