वीज मीटर काढून नेले, पण बिल पाठवणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:26+5:302020-12-26T04:07:26+5:30

कमल शर्मा नागपूर : वीज बिलातील चुकांच्या बाबतीत विक्रमावर विक्रम करीत असलेल्या महावितरण कंपनीचा नवीन प्रताप पुढे आला आहे. ...

Electricity meter removed, but billing continues | वीज मीटर काढून नेले, पण बिल पाठवणे सुरूच

वीज मीटर काढून नेले, पण बिल पाठवणे सुरूच

कमल शर्मा

नागपूर : वीज बिलातील चुकांच्या बाबतीत विक्रमावर विक्रम करीत असलेल्या महावितरण कंपनीचा नवीन प्रताप पुढे आला आहे. कंपनीने एका ग्राहकाचे वीज मीटर ऑगस्टमध्ये काढून नेले, पण त्या ग्राहकाला दर महिन्याला बिल पाठवले जात आहे. त्या ग्राहकास अद्याप सिक्युरिटी डिपॉझिट मिळाले नाही. उलट त्याला वीज बिलांना तोंड द्यावे लागत आहे.

पुरुषोत्तम गणेशानी असे ग्राहकाचे नाव आहे. वीज मीटर परत करणाऱ्या अनेक ग्राहकांना गणेशानी यांच्यासारखा मनस्ताप होत आहे. गणेशानी यांचे खामला रोडवरील कमल मेडिकोज येथे दोन वीज कनेक्शन होते. त्यामुळे त्यांनी एक कनेक्शन कमी करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी एक वीज मीटर परत नेऊन वीज कनेक्शन कापण्यात आले. असे असताना गणेशानी यांना पुढील महिन्यात १११० रुपयाचे बिल पाठविण्यात आले. त्यानंतर २६६० व ३०६० रुपयांचे बिल देण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे विजेचा वापर केवळ १ युनिट दाखवण्यात आला. या मीटरचे जुलैतील बिल केवळ १० रुपये होते हेदेखील येथे उल्लेखनीय आहे. महावितरणच्या या प्रतापामुळे गणेशानी त्रस्त झाले आहेत. त्रिमूर्तीनगर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी त्यांना, आधी वीज बिल भरा, नंतर तक्रारीचे निराकरण करू असे सांगितले आहे. गणेशानी बिल भरण्यास तयार नाहीत.

---------------

गंभीर प्रकरण

हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. प्रकरणाची चौकशी केली जाईल. मीटर काढल्याची माहिती सिस्टीममध्ये फिड करण्यात आली नसेल असे दिसून येत नाही. ग्राहकाला नियमानुसार सिक्युरिटी डिपॉझिट परत केले जाईल. त्यासाठी पोर्टलवर अर्ज करता येतो.

----- अमित परांजपे, अधीक्षक अभियंता.

Web Title: Electricity meter removed, but billing continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.