विजेच्या धक्क्याने ९ बैल ठार
By Admin | Updated: June 5, 2017 18:16 IST2017-06-05T18:16:10+5:302017-06-05T18:16:10+5:30
शेतात चरायला गेलेल्या बैलांच्या कळपाला विजेचा धक्का लागून ९ बैल जागीच ठार झाल्याची घटना येथे घडली.

विजेच्या धक्क्याने ९ बैल ठार
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर- शेतात चरायला गेलेल्या बैलांच्या कळपाला विजेचा धक्का लागून ९ बैल जागीच ठार झाल्याची घटना येथे घडली.
राजुरा तालुक्यातील सिंदी येथे सोमवारी सकाळी १० च्या सुमारास गुराखी बैलांचा कळप घेऊन शेतात गेला असता, आदल्या दिवशी संध्याकाळी झालेल्या वादळी पावसाने शेतालगतच्या विद्युत तारा खाली पडल्या होत्या. चरत असलेल्या या संपूर्ण कळपालाच या तारांचा स्पर्श झाल्याने ९ बैल जागीच ठार झाले. गुराख्याने आरडाओरडा करून गावकऱ्यांना बोलावले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. बैलमालकांना नुकसान भरपाई दिली जावी अशी मागणी केली जात आहे.