मिहानमध्ये सवलतीच्या दराने वीज
By Admin | Updated: June 14, 2014 02:55 IST2014-06-14T02:55:22+5:302014-06-14T02:55:22+5:30
विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या नागपुरातील मिहान प्रकल्पांतर्गत ...

मिहानमध्ये सवलतीच्या दराने वीज
नागपूर : विदर्भासाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या नागपुरातील मिहान प्रकल्पांतर्गत उभारण्यात येत असलेल्या विशेष आर्थिक क्षेत्रात (एसईझेड) गुंतवणूक करणाऱ्यांना ३० ते ३५ टक्के सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. मिहानमध्ये विजेच्या दराची समस्या निर्माण झाली होती. शिवाय वीज पुरवठ्याचाही प्रश्न होता. यावर तोडगा काढण्याची उद्योजकांची मागणी होती. काही उद्योग परतीच्या मार्गावर होते. मिहान प्रकल्प अडचणित येत असल्याचे पाहून राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांकडे मांडला. मिहानमध्ये एमएडीसी स्वत: वितरक आहे. एमएडीसीदेखील एक्स्पेंडमधून वीज खरेदी करू शकते. आपणही कमी दरात वीज खरेदी करतो. पण त्यावर कृषी सबसिडीचा लोड टाकतो. मिहानमध्ये अशा लोडची गरज नाही. कारण ती वीज मिहानमध्येच वापरली जाणार आहे. एमएडीसीला बाजारातून वीज खरेदी करण्याचे अधिकार देण्यात यावे, अशी भूमिका मांडली. रोहयोमंत्री नितीन राऊत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनीही हा विषय लावून धरला.