महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या वीज ग्राहकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:05 IST2021-03-29T04:05:12+5:302021-03-29T04:05:12+5:30
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी महावितरणचे उच्चस्तर लिपिक अलोक वाघ हे लाईनमन विजय माहुरे, कृष्णा रोकडे व सतीश ...

महावितरण कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या वीज ग्राहकाला अटक
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी महावितरणचे उच्चस्तर लिपिक अलोक वाघ हे लाईनमन विजय माहुरे, कृष्णा रोकडे व सतीश मिरे यांना सोबत घेऊन लघुवेतन कॉलनी परिसरात थकबाकीदार वीज ग्राहक कल्याण सांगोळे याच्याकडील खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यास गेले होते. वीजपुरवठा खंडित केल्यामुळे चिडलेला कल्याण व त्याच्या इतर दोन साथीदारांनी सतीश मिरे यांना जमिनीवर खाली पाडून शिवीगाळ केली व दोघांनाही मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराची माहिती महावितरणच्या एमआरएस उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गिरीधर सोरते व सहायक अभियंता संजय भागवत यांना देण्यात आली. यानंतर महावितरणकडून या घटनेची रीतसर तक्रार जरीपटका पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी कल्याण सांगोळे व रवि सांगोळे, कमलेश सांगोळे या दोन साथीदारांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३३२, ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आरोपींना अटक करण्यात आली.