शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

वीज बिल येणार प्रचंड, ग्राहकात उडणार हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 9:31 PM

मार्च महिन्यानंतर मीटर रीडिंग घेणे पुन्हा सुरू झाले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रीडिंगनुसार बिल घरपोच मिळणे सुरू होणार असले तरी या बिलांमुळे ग्राहकांमध्ये बराच गदारोळ माजण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्यानंतर मीटर रीडिंग घेणे पुन्हा सुरू झाले आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून रीडिंगनुसार बिल घरपोच मिळणे सुरू होणार असले तरी या बिलांमुळे ग्राहकांमध्ये बराच गदारोळ माजण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील १२ लाख ५ हजार ८५९ पैकी फक्त ३६ हजार २४६ ग्राहकांनीच महावितरणकडे मीटर रीडिंग पाठवले. उर्वरित ११ लाख ६९ हजार ६१३ ग्राहकांचे रीडिंगच नसल्याने त्यांना अंदाजे बिल पाठविण्यात आले होते. यातील अनेकांनी बिल भरलेलेच नाही. आता अशा ग्राहकांच्या मीटरचे रीडिंग घेऊन बिल पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हे बिल अपेक्षेपेक्षा अधिक असल्याने असा प्रकार घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.लॉकडाऊनमुळे मीटर रीडिंग घेण्याची आणि बिल पाठविण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. कलेक्शन सेंटरही बंद करण्यात आले होते. यामुळे महावितरणने मागील वर्षातील वीजवापराच्या आकडेवारीनुसार मोबाईल एसएमएसवरून बिल पाठविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र अनेक ग्राहकांनी बिलच भरले नाही. त्यामुळे महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले होते. परंतु अनेक नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही. एप्रिल महिन्यात २३ हजार ६०८ ग्राहकांनीच रीडिंग पाठविले होते. मे महिन्यात ही संख्या वाढून ३६ हजार २४६ वर पोहचली. प्रतिसाद न देण्याऱ्यांची संख्या ११ लाख ६९ हजार ६१३ आहे. आता या सर्वच ग्राहकांना एकत्र बिल पाठविले जाणार असल्याने हाहाकार उडणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात वापर अधिक असल्याने अर्थातच बिलही अधिक असणार आहे.दुसरीकडे अनेक राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी ३०० युनिटपर्यंतचे बिल माफ करण्याची मागणी केली आहे. परंतु राज्य सरकार यात सूट देण्याच्या मानसिकतेत नाही. लॉकडाऊनच्या काळात महावितरणला ७५० कोटी रुपयांचा तोटा आल्याने, हे शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.शहरात गांधीबाग मागेशहराच्या चार डिव्हिजनपैकी मीटिर रीडिंग पाठविण्यात गांधीबाग डिव्हिजन सर्वात मागे आहे. इतवारी सब डिव्हिजनमधील ३३,२०७ ग्राहकांपैकी फक्त ३२१ ग्राहकांनाच रीडिंग पाठवीले. हे शहरातील मोठे व्यापार क्षेत्र आहे. ग्राहकांच्या मते, लॉकडाऊनच्या काळात प्रतिष्ठाने बंद होती. संचारबंदीमुळे घरून प्रतिष्ठानांमध्ये जाणेही शक्य नव्हते. त्यामुळेच रीडिंग पाठविता आले नाही.उत्पन्नात ३१६.५०० कोटींवरून १२९.३५ कोटींपर्यंत घसरणलॉकडाऊनच्या काळात ग्राहकांकडून बिल भरण्यात न आल्याने महावितरणचे उत्पन्न प्रभावित झाले. जानेवारी महिन्यात कंपनीला नागपूर जिल्ह्यातून ३१६.५० कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा वीज बिलांच्या माध्यमातून होती. फेब्रुवारी महिन्यात हा आकडा ३०२.३८ कोटी होता. मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात लॉकडाऊन सुरू झाल्याने महावितरणला २७९.५४ कोटी रुपये मिळाले. तर, एप्रिल महिन्यात फक्त १२९.३५ कोटी रुपये मिळाले. यापैकी ९९.४ कोटी रुपये उद्योगांमधून आले. जानेवारीमध्ये १५४.९५ कोटी रुपयांचे बिल भरणाºया घरगुती ग्राहकांनी एप्रिल महिन्यात फक्त २९.९५ कोटी रुपयांचे बिल भरले. त्यामुळे सहाजिकच रिडींगनुसार पाठविण्यात आलेले बिल लॉकडाऊनच्या काळात भरण्यात न आल्याने ती रक्कमही यात लागून येणार आहे.

टॅग्स :electricityवीजbillबिल