शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

वीजबिलाची वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण; अग्रसेन चौकात तणावसदृष्य स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2022 17:16 IST

आरोपीला अटक

नागपूर : वीजबिलाचे प्रलंबित शुल्क वसूल करण्यास आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारझोड करण्यात आल्याने सीए रोड, अग्रसेन चौक परिसरात तणावसदृश स्थिती निर्माण झाली होती. तहसील पोलिसांनी या प्रकरणात आरोपी लक्ष्य नीरज अग्रवालच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून, त्याला अटक केली आहे.

सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.३० वाजता रिपब्लिक कक्षातील वरिष्ठ तंत्रज्ञ सोपान श्यामराव मेक्रतवार आपल्या सहकाऱ्यांसह सीए रोड, अग्रसेन चौक, मेट्रो स्टेशनच्या मागील परिसरात वीजबिलाचे प्रलंबित शुल्क वसूल करत होते. दरम्यान ते राम प्रकाश अग्रवाल यांच्याकडे पोहोचले आणि रामप्रकाश यांचे नातू लक्ष्य नीरज अग्रवाल याला वीजबिल भरण्याची विनंती केली मात्र, लक्ष्यने बिल भरण्यास असमर्थता दर्शवली.

नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करतानाच लक्ष्य याने सोपान मेक्रतवार यांना शिव्या देण्यासोबतच मारझोड केली. यात सोपान जखमी झाले आहेत. या प्रकरणात मेक्रतवार यांनी लक्ष्य अग्रवालच्या विरोधात तहसील पोलीस ठाण्यात शासकीय कार्यवाहीत अडथळा निर्माण करण्याचा व मारहाण करण्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

हे प्रकरण पुढे येताच तहसील पोलीस ठाण्याचे ठाणेदार तृप्ती सोनवणे यांनी व्हिडीओद्वारे महावितरणच्या या कार्यात नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, महावितरणचे कर्मचारी आपल्या सेवेचे कर्तव्य निभावत आहेत. त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचे गैरव्यवहार न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीelectricityवीजnagpurनागपूरArrestअटक