विजेच्या ॲल्युमिनियम तारांची चाेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:07 IST2021-06-05T04:07:28+5:302021-06-05T04:07:28+5:30

उमरेड : चाेरट्याने खांबावरील विजेच्या ॲल्युमिनियम तारा कापून चाेरून नेल्या. त्या तारांची किंमत ४५ हजार रुपये आहे. ही घटना ...

Electrical aluminum wiring | विजेच्या ॲल्युमिनियम तारांची चाेरी

विजेच्या ॲल्युमिनियम तारांची चाेरी

उमरेड : चाेरट्याने खांबावरील विजेच्या ॲल्युमिनियम तारा कापून चाेरून नेल्या. त्या तारांची किंमत ४५ हजार रुपये आहे. ही घटना उमरेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव (साधू) शिवारात बुधवारी (दि. २) मध्यरात्री घडली.

उमरेड तालुक्यातील नवेगाव (साधू) शिवारातून महावितरण कंपनीची लघुदाबाची विद्युतवाहिनी गेली आहे. त्या विद्युतवाहिनीवर कृषिपंपांची कनेक्शन आहेत. दरम्यान, मध्यरात्री शिवारात कुणीही नसताना चाेरट्याने खांबांवर चढून विजेच्या तारा ताेडल्या आणि त्या चाेरून नेल्या. ही बाब लक्षात येताच महावितरण कंपनीचे सहायक अभियंता याेगेश आरीकर, रा. नागपूर यांनी पाेलिसांत तक्रार नाेंदविली. त्या तारांची किंमत ४५ हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. या प्रकरणी उमरेड पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार आनंद धात्रक करीत आहेत.

Web Title: Electrical aluminum wiring