शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

नागपुरातील दोन तरुणांनी तयार केली इलेक्ट्रीक कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 21:25 IST

दोन तरुणांनी पेट्रोल कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रुपांतरीत केले. विशेष म्हणजे, एक हजारपर्यंतचा भार सहन करण्याची ताकद या कारमध्ये आहे.

ठळक मुद्देमहागड्या पेट्रोलवर पर्याय : एक हजारपर्यंतचा भार सहन करण्याची कारमध्ये ताकद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहे. आखातातील युद्धसदृश स्थितीमुळे इंधनाच्या किमती गगनाला पोहोचत आहेत. दुसरीकडे प्रदूषणाचा विषय आहे. अशावेळी एकच पर्याय समोर येत आहे. तो म्हणजे इलेक्ट्रीक वाहनांचा. मात्र सध्याच्या कारच्या किमती पाहता या कार सामान्यांपासून कोसो दूरच आहेत. यावर पर्याय म्हणून दोन तरुणांनी पेट्रोल कारला इलेक्ट्रिक कारमध्ये रुपांतरीत केले. विशेष म्हणजे, एक हजारपर्यंतचा भार सहन करण्याची ताकद या कारमध्ये आहे.अभिजित खडाखडी व शुभम कनिरे, इलेक्ट्रिक कार तयार करणाऱ्या युवकांचे नाव.अभिजितने बीएससी. कॉम्प्युटर सायन्समधून शिक्षण घेतले तर शुभम हा अभियंता आहे. ‘लोकमत’शी बोलताना अभिजित म्हणाला, आम्हा दोघांना ‘ऑटोमोबाईल्स’ क्षेत्राची आवड. आमच्या संवादामध्ये नवी कार व तिच्यात असलेल्या गुणवत्तेवर नेहमीच चर्चा होत असते. एकदा यातूनच काहीतरी नवीन करण्याचा विचार समोर आला. एका दुचाकीचे इंजिन बदलून इलेक्ट्रीक इंजिन बसविण्याचा प्रयोग केला. तो यशस्वी झाला. त्याचीच प्रेरणा घेऊन आम्ही इलेक्ट्रिक कार करण्याची योजना आखली. आमचा बिल्डर मित्र अमोल पाटील यांनी कार तयार करण्यासाठी जागा दिली. खर्चासाठी एका बँकेतून कर्ज घेतले आणि स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू केली.एका चार्जिंगवर १८० किमीअभिजित म्हणाला, पेट्रोलमधून बॅटरीमध्ये रुपांतरीत झालेल्या एका कारची निवड केली. पेट्रोल इंजिन काढून त्या जागी इलेक्ट्रिक इंजिन जोडले. थोडेफार बदलही केले. इलेक्ट्रिक वाहनामध्ये जास्त भार वाहण्याची क्षमता नसते. परंतु जेव्हा तयार केलेल्या कारची क्षमता तपासली तेव्हा हजारपर्यंतचा भार उचलत असल्याचे लक्षात आले. या वाहनामध्ये १०० अ‍ॅप आणि १२ व्होल्टच्या चार बॅटऱ्या बसविण्यात आल्या आहेत. ही कार एका चार्जिंगवर १८० किमी.धावते. कारचे इलेक्ट्रिक इंजिन हे तीन हजार वॅटचे आहे. यामुळे याची लोडिंग कॅपेसिटी खूप जास्त आहे. कार तयार करायला दहा दिवस लागल्याचेही अभिजित म्हणाला.पेट्रोल गाडीसारखीच चालतेही इलेक्ट्रिक असली तरी पेट्रोल कार सारखीच चालते. यामुळे पीकअप पेट्रोल सारखेच आहे ‘मॅन्युअल गिअर सिस्टीम’ असल्याने चढाव व वजन सहन करू शकते. या कारमध्ये आणखी काही बदल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शुभमचे म्हणणे आहे.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारnagpurनागपूर