मनपातील सभापतींची १ मार्चला निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:08 IST2021-02-26T04:08:23+5:302021-02-26T04:08:23+5:30

आज उमेदवारी अर्ज दाखल करणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या विषय समिती सभापतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात ...

Election of Manpat Speaker on 1st March | मनपातील सभापतींची १ मार्चला निवड

मनपातील सभापतींची १ मार्चला निवड

आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या विषय समिती सभापतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार २६ फेब्रुवारीला मनपाच्या स्थायी समिती सभागृहात सकाळी १० ते १ पर्यंत अर्ज स्वीकारले जातील. त्यानंतर उमेवारांची यादी जाहीर केली जाईल. १ मार्चला पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोेजित बैठकीत सभापती व उपसभापतींची निवड केली जाणार आहे.

यात स्थापत्य व प्रकल्प समिती, आरोग्य समिती, विधी समिती, शिक्षण समिती, गलिच्छ वस्ती सुधार, घरबांधणी, गलिच्छ वस्ती सुधार, घरबांधणी, क्रीडा समिती, महिला व बालकल्याण, कर आकारणी व कर संकलन, जलप्रदाय समिती, अग्निशमन व विद्युत समिती आदी विषय समित्यांचे सभापती व उपसभापती निवडले जातील. महापौरांनी सभागृहात विषय समित्यांच्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली आहे. यात संभाव्य सभापतींची नावे जाहीर केली असल्याने निवडणूक प्रक्रिया ही एकप्रकारे औपचारिकता आहे.

....

संसर्ग रोखण्यासाठी साधेपणाने पदग्रहण

शहरात वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, नवनिर्वाचित झोन सभापतींच्या पदग्रहणाचा कोणताही मोठा कार्यक्रम न घेता झोन सभापती कक्षामध्येच औपचारिक कार्यक्रम पार पाडावा. पदग्रहणाला कुठेही गर्दी होऊ नये, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहेत. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स राखणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी मोठे समारंभ व गर्दी होणारे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Web Title: Election of Manpat Speaker on 1st March