शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने तिघींना उडवले; वृद्ध महिलेचा मृत्यू, दोघी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 18:35 IST

तिघीही राेडलगत असलेल्या एका हाॅटेलसमाेर बसून वाहनाची प्रतीक्षा करीत हाेत्या. दरम्यान, वेगात आलेल्या ट्रकने त्या तिघींनाही जाेरात धडक दिली आणि ट्रक निघून गेला.

ठळक मुद्देअंभाेरा येथील राेडलगत असलेल्या तिघींना धडक

कुही (नागपूर) : वेगात जाणाऱ्या ट्रकने राेडलगत वाहनाची प्रतीक्षा करीत बसलेल्या तिघींना जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने वृद्ध महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य दाेघी जखमी झाल्या. ही घटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अंभाेरा येथे नुकतीच घडली.

बयनाबाई उर्फ लहानाबाई हरिश्चंद्र पडाेळे (७०, रा. गाेन्हा, ता. कुही) असे मृत महिलेचे नाव असून, शारदा अशाेक पडाेळे (रा. गाेन्हा, ता. कुही) व काैसल्या नारायण कुंभलकर (रा. चापेगडी, ता. कुही) अशी जखमींची नावे आहेत. शारदा व काैसल्या या बयनाबाईच्या नातेवाईक हाेत. तिघीही अंभाेरा, ता. कुही येथील राेडलगत असलेल्या एका हाॅटेलसमाेर बसून वाहनाची प्रतीक्षा करीत हाेत्या. दरम्यान, वेगात आलेल्या ट्रकने त्या तिघींनाही जाेरात धडक दिली आणि ट्रक निघून गेला. यात बयनाबाई यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर शारदा व काैसल्या जखमी झाल्या.

माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून बयनाबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर शारदा व काैसल्या यांना उपचारासाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. याप्रकरणी कुही पाेलिसांनी मृत बयनाबाई यांचा मुलगा श्रीकृष्ण हरिश्चंद्र पडाेळे (४८, रा. गाेन्हा, ता. कुही) यांच्या तक्रारीवरून ट्रकचालक राजू दयाराम बाळबुधे (४०, रा. गाेन्हा, ता. कुही) याच्या विराेधात गुन्हा दाखल करून त्याचा शाेध सुरू केला आहे. या घटनेचा तपास ठाणेदार आनंद कविराज करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर