लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फसवणूक व होत असलेल्या त्रासामुळे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने बिल्डरच्या घरासमोरच आत्महत्या केली. ही घटना अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पार्वतीनगरात घडली. मृत सुरेश दुलिचंद कनोजिया (६४) रा. साईलीला अपार्टमेंट, बेसा रोड येथील आहे. अजनी पोलिसांनी बिल्डर रविशंकर चंद्रभान गुप्ता (४५) पार्वतीनगर याला अटक केली आहे.कनोजिया रेल्वेतून सेवानिवृत्त झाले होते. बिल्डर गुप्ता याने १० ते १२ दुकाने बनविली होती. कनोजिया यांनी संदीप पांडे नामक व्यक्तीच्या माध्यमातून गुप्तासोबत १५ लाख रुपयात दुकानाचा व्यवहार केला होता. सुरुवातीला गुप्ताला ६ लाख रुपये दिले होते. मात्र निर्माण कार्य अवैध असल्याने दुकान तोडण्यात आले. त्यामुळे व्यवहार अर्धवटच झाला होता. काही दिवसानंतर गुप्ता याने नवीन दुकाने बनवून दुसऱ्याला विकली. त्यामुळे कनोजिया गुप्ताला ६ लाख रुपयांची मागणी करू लागले. गुप्ता याने त्यांना २ लाख रुपये परत केले. ४ लाख रुपयांसाठी दोघांमध्ये वाद सुरू होता. कनोजिया वारंवार गुप्ताला पैसे मागत होते. परंतु गुप्ता गुंडाकडून कनोजियाला धमकावत होता. त्यामुळे कनोजिया हताश झाले. ८ जून रोजी सकाळी ११.३० वाजता ते गुप्ताच्या घरी गेले. त्यांनी गुप्ताला पैसे परत मागितले. मात्र गुप्ताने नकार दिला. कनोजियाने आत्महत्या करण्याचा इशारा दिला. मात्र गुप्ताने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी कनोजिया यांनी ज्वलनशील पदार्थ शरीरावर टाकून आग लावली. लोक जमा झाले त्यांनी कनोजियाला रुग्णालयात पोहचविले. अजनी पोलीस सुद्धा घटनास्थळावर पोहचले. कनोजियाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोेलिसांनी गुप्ताच्या विरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुप्ताला अटक करण्यात आली. सूत्रांच्या मते या प्रकरणात चर्चित ‘गोल टोपी’सह अनेक गुन्हेगार लिप्त आहे. गुप्ता बिल्डर असून अवैध सावकारी देखील करतो. वसुली करण्यासाठी गुंडांची मदत घेतो. गुंडाच्या मदतीने त्याने कनोजियाला देखील धमकावले होते. त्यामुळे त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलिसांनी कसून चौकशी केल्यास गुप्ताचे मदतगारसुद्धा पोलिसांच्या जाळ्यात अडकू शकतात. सध्या मदतगार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.
नागपुरात बिल्डरच्या घरापुढे वृद्धाचे आत्मदहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 20:59 IST
फसवणूक व होत असलेल्या त्रासामुळे सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने बिल्डरच्या घरासमोरच आत्महत्या केली. ही घटना अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पार्वतीनगरात घडली.
नागपुरात बिल्डरच्या घरापुढे वृद्धाचे आत्मदहन
ठळक मुद्देसेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी फसवणूक झाल्यामुळे होता त्रस्त