दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:08 IST2021-03-19T04:08:23+5:302021-03-19T04:08:23+5:30

भिवापूर : भरधाव दुचाकीस्वाराने रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धाला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. ...

Elderly man killed in two-wheeler collision | दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार

दुचाकीच्या धडकेत वृद्ध ठार

भिवापूर : भरधाव दुचाकीस्वाराने रस्त्याने पायी जाणाऱ्या वृद्धाला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील टाका येथे बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

संपत विठू धारगावे (८८, रा. टाका, ता. भिवापूर) असे मृताचे नाव आहे. संपत धारगावे हे सकाळच्या सुमारास टाका ते भिसी राेडने पायी जात हाेते. यादरम्यान भिसीकडून टाका गावाकडे येणाऱ्या एमएच-३४/एक्स-९५६२ क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जाेरात धडक दिली. त्यात गंभीररीत्या दुखापत झाल्याने संपत धारगावे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी रामकृष्ण संपत धारगावे (५५, रा. टाका, ता. भिवापूर) यांच्या तक्रारीवरून भिवापूर पाेलिसांनी दुचाकीचालक आशिष राजू गेडाम (रा. टाका, ता. भिवापूर) भादंविचे कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला. पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक शरद भस्मे करीत आहेत.

Web Title: Elderly man killed in two-wheeler collision