वृद्धाची आजाराला कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:08 IST2021-08-01T04:08:51+5:302021-08-01T04:08:51+5:30

कामठी : छातीच्या आजारपणाला कंटाळून वृद्धाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील येरखेडा ...

Elderly man commits suicide due to illness | वृद्धाची आजाराला कंटाळून आत्महत्या

वृद्धाची आजाराला कंटाळून आत्महत्या

कामठी : छातीच्या आजारपणाला कंटाळून वृद्धाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील येरखेडा येथे गुरुवारी (दि २९) मध्यरात्री घडली असून, शुक्रवारी (दि. ३०) सकाळी उघडकीस आली.

जिराखनदास गयालुदास माणिकपुरो (७२, रा. बीबी काॅलनी, येरखेडा, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. ते दाेन वर्षापासून छातीच्या दुखण्याने त्रस्त हाेते. त्यामुळे गुरुवारी रात्री कुणाचेही लक्ष नसताना ते घराबाहेर पडले आणि त्यांनी घराजवळच्या विहिरीत उडी घेतली. शुक्रवारी सकाळी ते घरात आढळून न असल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शाेध घेतला असता, त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह बाहेर काढला व उत्तरीय तपासणीसाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Elderly man commits suicide due to illness