शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री - फडणवीस यांच्याशी बैठकीनंतर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

By कमलेश वानखेडे | Updated: July 5, 2023 21:49 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपवर विश्वास दाखवून सोबत आले आहेत.

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपवर विश्वास दाखवून सोबत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्न येतोच कुठे. राज्यात केवळ संभ्रम निर्माण करणे सुरू आहे. शिंदे मुख्यमंत्री आहेत व २०२४ पर्यंत शिंदेच मुख्यमंत्री राहणार, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी कोराडी येथील भारतीय विद्याभवनच्या सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण झाल्यानंतर रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याघरी फडणवीस व बावनकुळे यांची बैठक झाली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचा गट सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत या नाराजीवर चर्चा झाली. बैठकीनंतर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले की, यापूर्वीच फडणवीस आणि आमच्या शीर्ष नेतृत्वाने तसेच अजित पवार यांनीही हे मान्य केले आहे की २०२४ पर्यंत शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. किंतु परंतु करून विरोधी पक्षाकडून महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा उद्योग सुरू आहे.

राज्यातील जनतेने भाजप व शिवसेनेच्या नैसर्गिक युतीला बहुमत दिले होते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी ते बहुमत मिळाले होते. पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र नैसर्गिक युतीसाठी परत आले. फडणवीस हे एक पाऊल मागे हटत उपमुख्यमंत्री झाले व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यामुळे आता कुणीही याबाबत गैरसमज करून घेऊ नये, असेही ते म्हणाले.

निवडणुका लागल्यावर जागावाटप ठरेल

- अजित पवार यांनी मुंबईतील मेल्व्यात आपण ९० जागा लढणार असल्याचे सांगितले. त्यावर बावनकुळे म्हणाले, आता जागा वाटपाचा प्रश्नच नाही. जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा जागा वाटपावर चर्चा होईल. नवीन मंत्र्यांच्या खाते वाटपाबाबत शिंदे, फडणवीस व पवार एकत्र बसून ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपमध्ये अस्वस्थता नाही

- भाजपमध्ये कुठेही अस्वस्थता नाही आम्ही विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षातून सत्तेत आलो. आमच्या आमदारांना मंत्रीपद मिळो ना मिळो, त्यांच्यासाठी देशहीत महत्त्वाचे असते, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा