एकनाथ खडसे यांनी रोहयोच्या विषयावर घेतला पंकजा मुंडे यांचा वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:13 IST2017-12-15T01:13:01+5:302017-12-15T01:13:05+5:30
विरोधी पक्षाकडून सत्ताधा-यांना एखाद्या प्रश्नावर घेरण्याचे, अडचणीत आणण्याचे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. परंतु सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून आपल्याच मंत्र्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार दुर्मीळच.

एकनाथ खडसे यांनी रोहयोच्या विषयावर घेतला पंकजा मुंडे यांचा वर्ग
- आनंद डेकाटे
नागपूर : विरोधी पक्षाकडून सत्ताधा-यांना एखाद्या प्रश्नावर घेरण्याचे, अडचणीत आणण्याचे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. परंतु सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांकडून आपल्याच मंत्र्यांना अडचणीत आणण्याचे प्रकार दुर्मीळच. असाच प्रकार गुरुवारी विधानसभेत पाहायला मिळाला. एकनाथ खडसे यांनी रोहयोच्या विषयावर प्रश्नांची सरबत्ती करीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा क्लास घेतला. विरोधी पक्षात असताना आपणच ही मागणी अनेकदा करीत होतो, आता आपण सत्तेत असल्याने ती मागणी पूर्ण करा, असा सल्ला देत अडचणीत आणण्याचाही प्रयत्न केला.