आठ पोलीस उपायुक्तांना हवी बदली

By Admin | Updated: April 7, 2017 02:44 IST2017-04-07T02:44:05+5:302017-04-07T02:44:05+5:30

९० टक्के पोलीस अधिकाऱ्यांना नागपुरातून बदली हवी आहे. काहींना मुंबई, पुण्यात पाहिजे तर काहींना कुठेही दिली तरी चालेल,

Eight police officers wanted to change | आठ पोलीस उपायुक्तांना हवी बदली

आठ पोलीस उपायुक्तांना हवी बदली

गृह विभागाला साकडे: चौघांचा सेवाकाळ पूर्ण
नरेश डोंगरे नागपूर
९० टक्के पोलीस अधिकाऱ्यांना नागपुरातून बदली हवी आहे. काहींना मुंबई, पुण्यात पाहिजे तर काहींना कुठेही दिली तरी चालेल, मात्र येथून बदली करून पाहिजे. होय, आधीच वरिष्ठ पोलीस अधिकारी नागपुरात रुजू व्हायला तयार नसताना नऊपैकी आठ पोलीस उपायुक्तांनी नागपुरातून बदली हवी म्हणून गृह विभागाला साकडे घातले आहे. चार उपायुक्तांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली होणे, अपेक्षितच आहे तर चार उपायुक्तांना वेगवेगळ्या कारणामुळे बदली हवी आहे.
झपाट्याने प्रगतीकडे झेपावणारे शहर म्हणून देशात नागपूरचे नाव घेतले जात असले तरी या शहरात काम करण्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खास करून आयपीएस कॅडरच्या अधिकाऱ्यांची अजिबात इच्छा नसते, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. येथे बदली झालेले अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी नागपुरात रुजू न होताच बदली रद्द करवून घेण्याच्या कामी लागतात. त्यात यश न आलेली मंडळी येथे रुजू तर होतात मात्र लगेच येथून काढता पाय घेतात. बदली झाल्यानंतर येथे रुजूच न झालेल्या किंवा अगदी चार-सहा महिन्यातच येथून अधिकाऱ्यांनी बदली करवून घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.
 
आठ पोलीस उपायुक्तांना हवी बदली

अतिरिक्त आयुक्त दैठणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुहास वारके, सहआयुक्त संतोष रस्तोगी, उपायुक्त जी. श्रीधर, एम. राजकुमार ही त्यातील काही नावे आहेत. अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झालेले विक्रमसिंह पाटणकर यांचीही लगेच पदोन्नतीवर नागपुरातून बदली झाली. आता येथे कार्यरत असलेल्या नऊपैकी आठ पोलीस उपायुक्त (परिमंडळ - ३ चे संभाजी कदम वगळता) बदलीसाठी उत्सूक आहेत. त्यापैकी परिमंडळ पाचचे उपायुक्त अभिनाश कुमार, गुन्हे शाखेचे (डिटेक्शन) रंजनकुमार शर्मा आणि गुन्हे शाखेचेच (ईओडब्ल्यू) ईशू सिंधू यांचा तीन वर्षांचा तसेच परिमंडळ एकच्या (दोनचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या) उपायुक्त दीपाली मासिरकर यांचाही अडीच वर्षांचा सेवाकालावधी झाला आहे. त्यामुळे या चार अधिकाऱ्यांची बदली अपेक्षितच आहे.
मात्र, अन्य पोलीस उपायुक्तांपैकी वाहतूक शाखेच्या स्मार्तना पाटील, विशेष शाखेसह परिमंडळ चारची जबाबदारी सांभाळणारे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी, परिमंडळ दोनचे राकेश कलासागर, प्रशासन सांभाळणारे सुहास बावचे यांना येथे अजून एक वर्ष पूर्ण व्हायचेच आहे. परंतु त्यांनाही नागपुरातून बदली हवी आहे. त्यासाठी आवश्यक औपचारिकता संबंधितांकडून करण्यात आल्याची माहिती आहे.

अतिरिक्त आयुक्त दैठणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुहास वारके, सहआयुक्त संतोष रस्तोगी, उपायुक्त जी. श्रीधर, एम. राजकुमार ही त्यातील काही नावे आहेत. अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झालेले विक्रमसिंह पाटणकर यांचीही लगेच पदोन्नतीवर नागपुरातून बदली झाली. आता येथे कार्यरत असलेल्या नऊपैकी आठ पोलीस उपायुक्त (परिमंडळ - ३ चे संभाजी कदम वगळता) बदलीसाठी उत्सूक आहेत. त्यापैकी परिमंडळ पाचचे उपायुक्त अभिनाश कुमार, गुन्हे शाखेचे (डिटेक्शन) रंजनकुमार शर्मा आणि गुन्हे शाखेचेच (ईओडब्ल्यू) ईशू सिंधू यांचा तीन वर्षांचा तसेच परिमंडळ एकच्या (दोनचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या) उपायुक्त दीपाली मासिरकर यांचाही अडीच वर्षांचा सेवाकालावधी झाला आहे. त्यामुळे या चार अधिकाऱ्यांची बदली अपेक्षितच आहे.
मात्र, अन्य पोलीस उपायुक्तांपैकी वाहतूक शाखेच्या स्मार्तना पाटील, विशेष शाखेसह परिमंडळ चारची जबाबदारी सांभाळणारे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी, परिमंडळ दोनचे राकेश कलासागर, प्रशासन सांभाळणारे सुहास बावचे यांना येथे अजून एक वर्ष पूर्ण व्हायचेच आहे. परंतु त्यांनाही नागपुरातून बदली हवी आहे. त्यासाठी आवश्यक औपचारिकता संबंधितांकडून करण्यात आल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)

सिंधू जाणार दिल्लीला
विशेष म्हणजे, बदलीची मागणी करणाऱ्या उपरोक्त अधिकाऱ्यांपैकी बहुतांश उपायुक्तांनी मुंबई-पुण्याला पहिली पसंती दिली आहे. बदलींच्या यादीत सर्वात पहिले आणि पक्के नाव पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांचे आहे. त्यांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात बदली पक्की झाली आहे. केवळ कागदोपत्री प्रक्रिया आणि कार्यमुक्तीची औपचारिकता बाकी आहे. उर्वरित अधिकाऱ्यांपैकी दीपाली मासिरकर यांची मुंबईला बदली होणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे. अभिनाश कुमार आणि रंजनकुमार शर्मा यांना मुंबई, पुणे किंवा चांगले जिल्हे मिळण्याची शक्यता आहे. नागपुरात यायला पोलीस अधिकारी तयार नसतात. त्यामुळे अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदली अर्जावर पुढच्या टप्प्यात विचार केला जाणार असल्याची माहिती आहे.

---

---

Web Title: Eight police officers wanted to change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.