राजाेली जिल्हा परिषद सर्कलमध्ये आठ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:09 IST2021-07-07T04:09:57+5:302021-07-07T04:09:57+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क मांढळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती पाेटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. ५) कुही तालुक्यातील ...

Eight nomination papers filed in Rajaeli Zilla Parishad circle | राजाेली जिल्हा परिषद सर्कलमध्ये आठ उमेदवारी अर्ज दाखल

राजाेली जिल्हा परिषद सर्कलमध्ये आठ उमेदवारी अर्ज दाखल

लाेकमत न्यूज नेटवर्क

मांढळ : जिल्हा परिषद, पंचायत समिती पाेटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (दि. ५) कुही तालुक्यातील राजाेला जिल्हा परिषदमध्ये आठ, पंचायत समितीच्या सिल्ली गणातून सात तर तारणा गणातून सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

राजोला जिल्हा परिषद सर्कलमधून काँग्रेसचे अरुण हटवार, भाजपचे आस्तिक सहारे, राष्ट्रवादीचे भागेश्वर फेंडर, बहुजन वंचित आघाडीचे मंगेश भाेतमांगे, बालू ठवकर, दिगांबर हिरेखन, वसंत मुंडले, राजकुमार मेश्राम यांनी तर पंचायत समितीच्या सिल्ली गणातून काँग्रेसच्या जयश्री कढव, शिवसेनेच्या रेखा दंडारे, भाजपच्या वैशाली भुजाडे, बहुजन वंचित आघाडीच्या यशोधरा वानखेडे, सविता लांजेवार, गुणेश्वरी पुडके, विभा बाभरे यांनी तसेच तारणा गणातून काँग्रेसचे संदीप खानोलकर, भाजपचे रमेश रोहणकर, शिवसेनेचे घनश्याम भुरे, बहुजन वंचित आघाडीचे परसराम वंजारी, देवीदास गवळी, मोरेश्वर मांढरे यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते हरीश कढव ऐनवेळी काँग्रेसचा हात धरला. त्यांच्या पत्नी तथा साताराच्या सरपंच जयश्री कढव यांना काँग्रेसने सिल्ली पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली आहे.

Web Title: Eight nomination papers filed in Rajaeli Zilla Parishad circle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.